मराठी बातम्या /बातम्या /देश /

विहिंप स्थानिक प्रमुखावर गुन्हा, 1 लाखाहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स विक्री

विहिंप स्थानिक प्रमुखावर गुन्हा, 1 लाखाहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स विक्री

Jabalpur : पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर घोटाळा प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नर्मदा विभाग अध्यक्षासह इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jabalpur : पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर घोटाळा प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नर्मदा विभाग अध्यक्षासह इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jabalpur : पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर घोटाळा प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नर्मदा विभाग अध्यक्षासह इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Published by:  News18 Desk

जबलपूर (मध्य प्रदेश), 10 मे : जबलपूर पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर घोटाळा प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या (VHP - Vishwa Hindu Parishad) नर्मदा विभाग अध्यक्षासह इतर दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोरोना महामारीच्या फैलावादरम्यान आपल्या प्रियजनांना वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना अनधिकृतरीत्या एका लाखाहून अधिक बनावट इंजेक्शन्सची (fake remdesivir) विक्री झाली.

‘सरबजीतसिंग मोखा, देवेंद्र चौरसिया आणि स्वपन जैन अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलम, ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम 274, 275, 308 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असे जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहित काशवानी म्हणाले.

जबलपूर विहिंप अध्यक्ष सरबजीतसिंग मोखा हे सिटी हॉस्पिटलचे मालकही आहेत. देवेंद्र चौरसिया त्यांचे मॅनेजर म्हणून काम करतात. तर, स्वपन जैन हे फार्मा कंपन्यांचे डिलरशिप सांभाळतात. स्वपन जैन यांना सुरत पोलिसांनी अटक केली आहे, तर मोखा आणि चौरसिया अद्याप फरार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखा सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होता. त्याला इंदूरमधून 500 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळाली होती. ती त्याने रुग्णालयात प्रत्येकी 35000 ते 40000 रुपयांना विकली.

हे वाचा - नेपाळच्या पंतप्रधानांना मोठा झटका, स्वकीयांमुळेच अविश्वास ठरावात खाल्ली आपटी

दरम्यान, काँग्रेसने बनावट रेमडेसिवीर रॅकेटची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मीठ आणि ग्लुकोज वापरून तयार केलेली इंजेक्शन्स रुग्णांना विकण्यात आली होती. अशी एक लाखाहून अधिक इंजेक्शन्स देशभरात मोठ्या जाळ्याद्वारे विकली गेली.

‘सीबीआयने या बहु-राज्य घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. अशी 3000 इंजेक्शन्स इंदूरला, 3500 इंजेक्शन्स जबलपूरला पोहोचली. कोणाकोणाला ही इंजेक्शन्स दिली गेली होती? या प्रकरणी सीबीआय चौकशी न केल्यास आम्ही न्यायालयात जाऊ,’ असा इशारा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तन्खा यांनी ट्विटद्वारे दिला. त्यांनी हे ट्विट सीबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅगही केले आहे.

दरम्यान, इंदूर पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या 11 जणांपैकी सहा जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांअंतर्गत (एनएसए) जोरदार कारवाई सुरू केली आहे. इंदूरमधील विजय नगर पोलिसांनी सुरत पोलिसांकडून सूचना दिल्यानंतर कारवाईचा बडगा उचलला. एका कॉन्स्टेबलला त्याच 246039 A बॅचच्या रेमडेसिवीर इंजेक्शन्स विकणार्‍या आरोपींपैकी एकाकडे बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आले.

हे वाचा - Maharashtra fight back! महाराष्ट्रातील कोरोनाचा ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट; दिलासादायक आकडेवारी

मागील आठवड्यात मित्राच्या आई-वडिलांसाठी इंजेक्शन खरेदी केल्याचा दावा एका तरुणाने केला होता. या मित्राच्या आई-वडिलांचे निधन झाल्याचे त्याने पोलिसांकडेही येऊन सांगितले होते. त्यांना देण्यात आलेली इंजेक्शन्स बनावट असून शकतात. अशी बनावट इंजेक्शन्स घेतलेल्यांचा शोध घेत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, अशा दाव्यांसह अनेक लोकांनी जबलपूर पोलिसांकडे संपर्क साधला असून त्याची पडताळणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात पोलिसांनी यापूर्वी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि सुरतजवळील फार्म हाऊसमधून दोन लोकांना अटक केली होती. या ठिकाणी मीठ आणि ग्लुकोजपासून बनविलेले एक लाखांहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स आढळल्याचा आरोप आहे.

First published:

Tags: Corona updates, Corona vaccination, Coronavirus, Madhya pradesh