कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?

कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?

  • Share this:

टोकियो, 27 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ मास्क (mask) घालण्याचा सल्ला देत आहे. लॉकडाऊन शिथील करत असताना जिथं सोशल डिस्टन्सिंग शक्य नाही तिथं मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असं असताना जपानमधील आरोग्य तज्ज्ञांनी (japan health experts) मात्र लहान मुलांना (children) मास्क घालू नका, असा सल्ला पालकांना दिला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क धोकादायक ठरू शकतं, असं जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जपान पीडियाट्रिक असोसिएनशनने पालकांना सावध केलं आहे, 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालू नका, त्यांना समस्या उद्भवू शकतात, अशी सूचना पालकांसाठी जारी केली आहे.

हे वाचा - शास्त्रज्ञांनी तयार केलं खास Inhaler; कोरोनाव्हायरसशी देणार टक्कर

2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं बंद करा. लहान मुलांचा एअर पॅसेज लहान असतो, मास्क घातल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. मास्करमुळे मुलांच्या हृदयावर ताण येऊ शकतोस, तसंच हिट स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो, अशी सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे.

हे वाचा - कोरोना नव्हे तर लॉकडाऊनमुळेच होतील जास्त मृत्यू; तज्ज्ञांनी केलं सावध

लहान मुलांमध्ये कोरोनाव्हायरसची गंभीर प्रकरणं अगदी कमी आहेत. बहुतेक लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनच कोरोनाची लागण झालेली आहे. शाळा किंवा डे केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (सीडीसी) आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनेही 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं तोंड कापडानं झाकू नये, असं म्हटलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

First published: May 27, 2020, 5:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या