मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आई झाल्यानंतर आलिया भट्ट करतेय एरियल योगा, वेट लॉससोबत होतात 'हे' जबरदस्त फायदे

आई झाल्यानंतर आलिया भट्ट करतेय एरियल योगा, वेट लॉससोबत होतात 'हे' जबरदस्त फायदे

एरियल योगा म्हणजे काय?

एरियल योगा म्हणजे काय?

मुलगी राहा हीचा जन्म झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेत आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी ती एरियल योगा करत आहे. गर्भधारणेनंतर तंदुरुस्त राहण्यासाठी एरियल योगा खूप मदत होते. तुम्हाला एरियल योगाचे जबरदस्त फायदे देखील माहित असले पाहिजेत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 जानेवारी : प्रेग्नन्सीनंतर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्ट योगाची मदत घेत आहे. यासाठी ती एरियल योगा करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती एरियल योगा करताना दिसत आहे. आलिया तिच्या योगा ट्रेनर अनुष्काच्या योगा क्लासमध्ये एरियल योगा करताना दिसली. आलियाने दोन महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला होता.

आलीय आणि रणबीर यांच्या मुलीचे नाव राहा असे आहे. प्रसूतीनंतरच्या शारीरिक समस्यांमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी अभिनेत्रीने या योगाचा अवलंब केला आहे. एरियल योगा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत करतो. प्रसूतीनंतर प्रत्येक नवीन आईने योग तज्ञाच्या सल्ल्यानंतर एरियल योगाचा सराव करावा. जाणून घ्या एरिअल योगा केल्याने आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात.

आवडत नसले तरी प्रेग्नन्सीत आवर्जून खा हे पदार्थ; नाहीतर जन्माला येईल अपंग बाळ

एरियल योगा म्हणजे काय?

thehotyogaspot.com नुसार, एरियल योगास गुरुत्वाकर्षण विरोधी योग असेही म्हणतात. हे पारंपारिक योगासारखेच आहे. परंतु ते जमिनीवर केले जात नाही तर हवेत कापडाच्या झुल्यावर केले जाते. हा झोका छताला बांधलेला असतो. हवेत लटकत असताना तुम्ही हा योगा करा. जे लोक हे योगासन प्रथमच करत असतील त्यांनी योगा तज्ञाच्या देखरेखीखालीच सराव करावा.

एरियल योगाचे फायदे

पाठदुखी दूर होते : जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेल तर तुम्ही एरियल योगास सुरुवात करू शकता. हे करत असताना, हॅमॉकच्या आधारामुळे तुमच्या सांधे आणि मणक्यावर कोणताही ताण आणि जास्त दबाव येत नाही. अशा परिस्थितीत, पाठदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. कोणतीही अस्वस्थता न वाटता तुम्ही पूर्ण शरीर कसरत करू शकाल.

श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत सुधारणा : योगा करताना नियंत्रित श्वास घेणे ही एक महत्त्वाची बाब आहे. एरियल योगामध्ये तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय दीर्घ श्वास घेऊ शकता. एरियल योगा तुम्हाला प्रत्येक पोझमध्ये आरामात राहण्यास सक्षम करते. चांगला श्वास घेतल्याने फुफ्फुसांची कार्य क्षमता सुधारते आणि ते मजबूत होतात.

लवचिकता वाढवते : शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी एरियल योग सर्वोत्तम आहे. हे तुम्हाला स्नायू आणि कंडर सुरक्षितपणे ताणण्यास मदत करते. या दरम्यान तुम्ही अशी योगासने करू शकता, जी तुम्ही जमिनीवर बसूनही करू शकत नाही.

तणाव कमी होतो : जर तुम्हाला तणाव आणि चिंतेची समस्या असेल तर तुम्ही एरियल योगा करू शकता. यामुळे मनाला आराम मिळतो. हे तुम्हाला उलटे लटकत असतानाही ध्यान करण्याची आणि सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी देते. तणाव दूर करण्यासोबतच एरियल योगामुळे शारीरिक संतुलन वाढते, उत्साही राहण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही एरियल योगाच्या पोझमध्ये असता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये रक्त वाहते. मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक ऑक्सिजन प्रदान करते.

View this post on Instagram

A post shared by ANSHUKA YOGA (@anshukayoga)

चांगली झोप लागते : उलटे लटकत असताना योगा केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो, ज्यामुळे झोप चांगली लागते. एरियल योगा इतर अनेक शारीरिक व्यायामांप्रमाणे तुमच्या शरीराला एंडॉर्फिन आणि सेरोटोनिन सारख्या आनंदी हार्मोन्स सोडण्यास प्रोत्साहित करते. यामुळे तुम्हाला दिवसा अधिक ऊर्जा मिळते आणि रात्री शांत, निवांतपणा जाणवतो.

शरीराला पुनरुज्जीवित करते : एरियल योगासने केल्याने रक्ताभिसरण, श्वसन आणि पाचन तंत्राचे कार्य सुधारते, ज्यामुळे वृद्धत्व आणि त्याच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत होते.

आई-बाबा व्हायचंय पण कन्सिव्ह करायला अडचणी येताय? हे पदार्थ करतील तुमची मदत

कॅलरीज बर्न करते : एरियल योगामुळे कॅलरीज बर्न होण्यासही मदत होते. हवेत लटकण्यासाठी एक स्थिर कोर आवश्यक आहे, कारण स्थिती बदलणे खूप कठीण आहे. चटईवर योग करताना तुम्ही सहजपणे पोझिशन्स बदलू शकता. सुमारे 50 मिनिटे एरियल योगा केल्याने तुम्ही सुमारे 320 कॅलरीज बर्न करू शकता. यामुळे वजनही कमी होईल. असे सहा आठवडे केल्याने हृदयविकाराचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy, Types of exercise