वॉशिंग्टन, 13 जुलै : एकिकडे जगभर कोरोनाव्हायरस (Coronavirus) थैमान घालतो आहे. माणसांमधील हा आजार कमी की काय? त्यात आता पक्ष्यांना बळावलेल्या अज्ञात आजाराने (Mysterious illness in Birds) चिंता वाढवली आहे. रहस्यमयी आजारामुळे शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला (Birds dying from mysterious illness) आहे. त्यामुळे माणसांनी आता फक्त माणसामाणसांमध्येच नाही तर पक्ष्यांपासूनहीही सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकेत पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. स्टारलिंग्स, ब्लू जेज़, ग्रॅकल्स अशा पक्ष्यांचा यात समावेश आहे. 2 महिन्यांपूर्वी व्हर्जिनिया, वॉशिंग्टन आणि मेरीलँडनंतर आता केंटकी, डेलावेयर आणि विस्कॉन्सिनमध्ये ही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे ही पक्ष्यांमध्ये आलेल्या महासाथीचे संकेत असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. हा आजार नेमका काय आहे याची माहिती झालेली नाही. या मृत पक्ष्यांचं पोस्टमॉर्टेम युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियाच्या स्कूल ऑफ वेटरनिटी मेडिसीनमध्ये केलं जातं आहे.
हे वाचा - कसं शक्य आहे? 'हा' मुलगा चक्क देतोय कोंबडीसारखी अंडी; पाहून डॉक्टरही हैराण
सामान्यपणे साल्मोनेला आणि क्लामायिडया या बॅक्टेरिया संसर्गामुळे पक्ष्यांचा असा मृत्यू होतो. पण हे बॅक्टेरिया संक्रमण नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील आरोग्य संस्था सीडीसीने पक्ष्यांचा मृत्यूला एवियन इन्फ्लुएंझा, वेस्ट नाइल, हर्पीज, पॉक्स असे व्हायरस किंवा येलो फिव्हर कारणीभूत असू शकतात हे नाकारलं आहे. काही पक्ष्यांचा डोळ्यांची दृष्टी गेली आहे. त्यांना न्यूकॅलस डिसीज व्हायरसची लागण तर झाली नाही ना, याचा तपास करण्यात आला. कारण हाच व्हायरस पक्ष्यांमधील कंजक्टिवाइटिससाठी जबाबदार असतो. पण त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला.
रिपोर्टनुसार अॅनिमल वेलफेयर लीग ऑफ अर्लिंग्टन संस्थेचे प्रवक्ते चेलेसी जोन्स म्हणाल्या, आम्ही मृत पक्ष्यांची तपासणी केली तेव्हा दिसून आलं की, त्यांच्या डोळ्यांच्या मागे पांढऱ्या रंगाचा क्रस्ट जमा झाला होता. ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली होती. काही पक्ष्यांना तर त्यांची दिशाही शोधता येत नव्हती. त्यांना दिशाभ्रम होत होता. थकव्यामुळे ते उडूही शकत नव्हते. या आजाराचा संबंध त्यांच्या मेंदूशी आहे म्हणजे ही न्यूरोलॉजिकल समस्या आहे हे स्पष्ट होतं.
हे वाचा - मोठी बातमी! भारतातील पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात
अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जिथं पक्ष्यांचा असा रहस्यमयी मृत्यू होतो आहे, तिथं लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. आतापर्यंत या आजाराबाबत माहिती झालेली नाही. पण पक्ष्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Serious diseases