व्हिडीओत पाहू शकता, नवरा-नवरी एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घालायला समोरासमोर उभे आहेत. नवरा नवरीला अंगठी घालायला म्हणून तिचा हात हातात घेतो. नवरीचा हात हातात धरून तो तिला अंगठी घालण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा हात थरथरू लागतो. त्याला नवरीच्या हातात अंगठी घालणंही शक्य होत नाही. नवऱ्याला अशी अवस्था पाहून नवरीला हसू येतं. ती आपलं हसू आवरू शकत नाही. हे वाचा - VIDEO - भरमांडवात फुटला वराच्या अश्रूचा बांध; नवरीऐवजी स्वत:च ढसाढसा रडू लागला ट्रेंडिंग वेडिंग कपल या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एन्गेजन्मेंट एक्साइटमेंट असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Couple, Viral, Viral videos, Wedding couple, Wedding video