नवी दिल्ली, 15 जुलै : आज-काल पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये सकाळी ऑफिसला जाण्याची धावपळ (Morning rush) असते. अशा वेळेस लवकर उठून हेल्दी ब्रेकफास्ट (Healthy Breakfast) तयार करण्याइतका वेळ नसतो. त्यामुळे फटाफट तयार होणारा ब्रेकफास्ट म्हणून ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सकडे पाहिलं जातं. डायटिंग करणारे लोक सुद्धा ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स (oats & corn flakes) खातात. पण, यात नेमका फरक काय आहे? आणि कोणता पदार्थ हेल्दी आहे? हे माहिती असायला हवं.
ओट्सची न्यूट्रिशन व्हॅल्यू
ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामध्ये बीटा ग्लूकेन असतं. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. 100 ग्रॅम ओट्समध्ये 10.8 ग्रॅम फॅट, 26.4 ग्राम प्रोटीन, 16.5 ग्रॅम फायबर, 103 ग्रॅम कार्बोहाड्रेट 8 % कॅल्शिअम आणि 607 कॅलरीज असतात.
(VIDEO - याला कुणीतरी आवरा! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय?)
ओट्स खाण्याचे फायदे
ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होतं. सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खाल्ले तर, बराच काळ भूक लागत नाही. पोट भरलेलं राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यातही मदत मिळते. ओट्सला ग्लायसेमिक इंडेक्स फूड मानलं जातं. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. नियमित स्वरूपात खाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होत जातं.
(अखेर रिअल टार्झन सापडलाच! आयुष्याची 41 वर्षे कसा जगला जंगलात पाहा)
कॉर्न फ्लेक्सची न्यूट्रिशन व्हॅल्यू
मक्यापासून तयार होणाऱ्या कॉर्न फ्लेक्समध्ये फायबर जास्त असतं. 100 ग्रॅम कॉर्न फ्लेक्समध्ये 0.4 ग्रॅम फॅट असतं, 84 ग्रॅम कार्बोहायड्रेट 7.5 ग्रॅम प्रोटीन, 1.2 ग्रॅम फायबर 2% कॅल्शिअम आणि 378 कॅलरीज असतात.
(हातपाय खिळखिळे होईपर्यंत देश पिंजून काढला; अखेर 24 वर्षांनी बापाने लेकाला शोधलंच)
कॉर्न फ्लेक्स खाण्याचे फायदे
कॉर्न फ्लेक्स हृदयासाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं. यात फॅटी ऍसिड अतिशय कमी प्रमाणात असतं. दूध आणि कॉर्न फ्लेक्स एकत्र घेतल्यामुळे चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं. याशिवाय यामध्ये मध आणि बदाम घाटल्यास पोषक घटक वाढतात. फुप्फुसाचं आरोग्य चांगलं राहतं.
वजन कमी करणाऱ्यासाठी कॉर्न फ्लेक्स हा चांगला आहार मानला जातो सकाळी नाश्त्यात कॉर्न फ्लेक्स घेतल्यामुळे जास्त भूक लागत नाही यात कमी कॅलरी नसतात. त्यामुळे वजन लवकर कमी होत.
(COVID-19 Vaccine: लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे अधिक दुष्परिणाम का होतात?)
कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स
कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स दोन्ही हेल्दी आहेत. शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात असणार्यांसाठी म्हणजेच व्यायाम करणाऱ्यांसाठी किंवा दगदग जास्त करणाऱ्यांसाठी कॉर्न फ्लेक्स जास्त फायदेशीर आहेत. मात्र डायबेटीस रुग्णांसाठी ओट्स खाणं उत्तम मानलं जातं. पोटाशी संबंधित त्रास असणाऱ्या लोकांनी ओट्स खाताना काळजी घ्यावी यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे पोट खराब होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health Tips, Lifestyle