कोल्हापूर, 10 सप्टेंबर: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील एका तरुणाला प्रेमप्रकरणातून जबरी मारहाण (Beating in love affair) झाल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांनी तरुणावर पाळत ठेवून ही मारहाण केली आहे. मारहाणीतून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर संशयित आरोपी नातेवाईक फरार झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मोन्या ऊर्फ शिवतेज विनायक घाटगे असं हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याचं गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण घरचे लग्नाला विरोध करतील, या भीतीनं संबंधित दोघे प्रेमीयुगुल काही दिवसांपूर्वी पळून गेले होते. पण नातेवाईकांनी त्यांना शोधून काढलं. यानंतर हे प्रकरण मिटवून घेण्यात आलं होतं. पण मृत शिवतेजवर प्रेयसीच्या कुटुंबीयांचा राग होता. हे प्रकरण मिटल्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी शिवतेजला बुधवारी रात्री बेदम मारहाण केली आहे.
हेही वाचा-वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव
संशयित आरोपी नातेवाईंकांनी बुधवारी रात्री शिवतेजला मांगले गावच्या परिसरात धनटकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतात जबरी मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, उपचारादरम्यान शिवतेजचा मृत्यू झाला आहे. मृत शिवतेजवर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. मात्र, संशयित आरोपींना जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा शिवतेजच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
हेही वाचा-पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर रेप
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकला असता, संबंधित आरोपी फरार असल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी शिवतेजवर पाळत ठेऊन अत्यंत हृदयद्रावक पद्धतीनं लव्ह स्टोरीचा The End केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Murder