मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

ही चिमुरडी आपल्या आईच्या शेजारीचं झोपली होती, त्यावेळी हा नराधम तेथे आला आणि...

ही चिमुरडी आपल्या आईच्या शेजारीचं झोपली होती, त्यावेळी हा नराधम तेथे आला आणि...

ही चिमुरडी आपल्या आईच्या शेजारीचं झोपली होती, त्यावेळी हा नराधम तेथे आला आणि...

पुणे, 9 सप्टेंबर : पुण्यातील वानवाडी सामूहिक (Pune gang rape case) बलात्काराचं प्रकरण धगधगत असताना आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुणे स्टेशन परिसरातून (Pune Railway Station) आणखी एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचं वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील 39 वर्षांच्या रिक्षावाल्याने या मुलीचं अपहरण केलं व तिच्यावर बलात्कार केला. या आरोपीला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला ही मुलगी आई शेजारी झोपलेली असताना या रिक्षावाल्याने मुलीला उचलून नेलं. या मुलीचं वय 6 वर्षे असल्याचं समोर आलं आहे. (Pune Rape of 6 year old girl sleeping on the sidewalk in the station area )

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनपासून आईच्या शेजारी झोपलेली असताना रात्री साधारण 1 च्या सुमारास या 6 वर्षांच्या मुलीला उचलून रिक्षात घालून मार्केटयार्ड परिसरामध्ये नेलं. तिथं नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. थोड्या वेळाने आईच्या लक्षात आलं की मुलगी शेजारी नाही. यानंतर ती समोर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात गेल्याचं दिसलं. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक केलं. सध्या या अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा-पुणे हादरलं! बहिणीसोबत केलेल्या विकृत कृत्याचा भावानं घेतला फिल्मी स्टाइल बदला

वानवाडी सामूहिक बलात्कारामुळे पुणे हादरलं

वानवाडी गँगरेप ( pune gang rape case) प्रकरणात नवीन माहिती समोर आली असून पीडित अल्पवयीन मुलीवर एकूण 13 जणांनी बलात्कार (rape) केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आणखी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. वानवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पीडित मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र, रात्री उशिरा गाडी नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. सुरुवातील सहा रिक्षाचालक आणि दोन रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी या पीडितेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली होती.

First published:

Tags: Pune, Rape