मराठी बातम्या /बातम्या /देश /

1 किंवा दोन नाही तर वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव

1 किंवा दोन नाही तर वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव

(File Photo)

(File Photo)

ही महिला घरातून 22 हजार रुपये आणि दागिने घेऊन पसार झाली होती. मात्र पुन्हा तरी घरी परतली.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : आसाममधील (Assam News) नगाव जिल्ह्यातील एका विवाहित महिला (Married Women) गेल्या 10 वर्षात कथित स्वरुपात आपल्या घरातून 25 वेळा पळाली आहे. महिलेच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर ती 20 ते 25 वेळा वेगवेगळ्या पुरुषांसोबत पळाली होती. आता ती पुन्हा घरी परतली आहे. आताही पती तिचा स्वीकार करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. (Women who ran away from home 25 times with different men But still the husband love her)

मध्य आसाममधील ढिंग लहकर गावात राहणाऱ्या महिलेला तीन मुलं आहेत. तिचा सर्वात लहान मुलगा 3 महिन्यांचा आहे. यापूर्वीही ती जेव्हा जेव्हा आपल्या घरातून पळाली होती, त्यानंतर काही दिवसात परत आली होती. नुकतीच ही महिला आपल्याच परिसरातील एका पुरुषासह कथित स्वरुपात पळाली होती. हे कथित स्वरुपात 25 व्या वेळेस महिला कोणी पुरुषासोबत पळाली आहे.

हे ही वाचा-Mumbai : ज्या तरुणीला प्रपोज केलं तिच्याच घरी पाठवत होता सेक्स टॉयच्या भेटवस्तू

व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या तिच्या पतीने सांगितल की, 4 सप्टेंबर रोजी जेव्हा मी मोटर गॅरेजमधून घरी परतलो, तेव्हा माझी पत्नी घरात नव्हती. ती माझ्या 3 महिन्यांच्या बाळाला शेजारच्यांकडे सोपवून पळून गेली होती. तिने शेजारच्यांना सांगितलं की, ती बकरींसाठी काहीतरी खायला घेऊन येत आहे. पती घरातून पळाली तेव्हा 22 हजार रुपये आणि काही दागिने घेऊन गेली. तिच्या सासऱ्यांनी सांगितलं की, यंदा ती कोणासोबत पळून गेली याबद्दल आम्हाला माहिती नाही. यादरम्यान ढिंग लहकर गावातील स्थानिकांचा आरोप आहे की, महिलेचे लग्नानंतर या भागातील अनेक पुरुषांसोबत अवैध्य संबंध होते.

First published:

Tags: Assam, Crime, Marriage