मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /गोव्याला फिरायला गेलेल्या कोल्हापूरच्या तरुणासोबत घडलं विपरीत; 3 दिवसांनी समुद्रात तरंगताना आढळला मृतदेह

गोव्याला फिरायला गेलेल्या कोल्हापूरच्या तरुणासोबत घडलं विपरीत; 3 दिवसांनी समुद्रात तरंगताना आढळला मृतदेह

Crime in Goa: गोव्याला फिरायला (went goa for picnic) गेलेल्या कोल्हापूरातील एका तरुणावर काळानं घाला घातला आहे. आपल्या जीवलग मित्रासोबत बीचवर फिरायला गेल्यानंतर हा अपघात घडला आहे.

Crime in Goa: गोव्याला फिरायला (went goa for picnic) गेलेल्या कोल्हापूरातील एका तरुणावर काळानं घाला घातला आहे. आपल्या जीवलग मित्रासोबत बीचवर फिरायला गेल्यानंतर हा अपघात घडला आहे.

Crime in Goa: गोव्याला फिरायला (went goa for picnic) गेलेल्या कोल्हापूरातील एका तरुणावर काळानं घाला घातला आहे. आपल्या जीवलग मित्रासोबत बीचवर फिरायला गेल्यानंतर हा अपघात घडला आहे.

हलकर्णी, 07 जुलै: गोव्याला फिरायला (went goa for picnic) गेलेल्या कोल्हापूरातील एका तरुणावर काळानं घाला घातला आहे. आपल्या जीवलग मित्रासोबत बीचवर फिरायला गेल्यानंतर, लाटांचा अंदाज न आल्यानं दोघांचाही समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेच्या तीन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह कोलवा बीचवर आढळून आला आहे. एकुलत्या एक मुलाचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. मंगळवारी हलकर्णी याठिकाणी आणून तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अनवश शौकत ताशिलदार असं समुद्रात बुडालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गोव्यात राहणारा मित्र मुस्तफिन शेखला भेटायला गेला होता. दोघंही बिचवर फिरायला गेले असता, लाटांचा अंदाज न आल्यानं त्यांच्यासोबत हा अपघात घडला असावा, असं सांगण्यात येत आहे. मित्र मुस्तफिनचा मृतदेह रविवारी कोलवा बिच परिसरात आढळला होता. तर अनवशचा मृतदेह घटनेच्या तीन दिवसांनी कोलवा बिचवरच आढळला आहे.

हेही वाचा-लसीकरण सुरू असताना डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमधून समोर आलं कारण...

रविवारी (4 जुलै) आपला मुलगा समुद्रात बुडल्याची माहिती मिळताच, हलकर्णीतील मृत मुलाचे काका नजीर ताशिलदार, हसन ताशिलदार, चुलते फयाज ताशिलदार, शोएब पानारी, समीर बाडकर या पाच जणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मुलाचा मृतदेह मिळेपर्यंत पाचही जणांनी दोन रात्री बीचवरचं जाग राहून काढल्या आहेत.

हेही वाचा-औरंगाबादमध्ये तरुणाला विवस्त्र करून मारहाण, VIDEO VIRAL

तटरक्षक दलाच्या मदतीनं हेलिकॉप्टरनं रविवारपासून मृतदेहाची शोधमोहीम राबवली जात होती. दोन दिवस अथक प्रयत्न करूनही अनवशचा मृतदेह सापडत नव्हता, रविवारी तासभर शोधमोहीम राबवून थांबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी परिसरात अनेक ठिकाणी शोधाशोध केली. तरीही अनवशचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजता अनवशचा मृतदेह कुलावा बीच परिसरात पाण्यावर तरंगताना आढळला आहे. अनवशनं बीएसस्सीचं शिक्षण घेतलं होतं. मागील तीन वर्षांपासून तो वेर्णा कंपनीत काम करत होता. पण एकुलता एक मुलगा नियतीनं हिरावल्यानं ताशिलदार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Goa, Kolhapur