जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण...

लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण...

लसीकरण सुरू असतानाच डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, वाचा काय होतं कारण...

Ahmednagar Doctor suicide: अहमदनगरमध्ये डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अहमदनगर, 6 जुलै : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Covid vaccination) सुरू असतांनाच तेथील डॉक्टर गणेश शेळके (Dr Ganesh Shelke) यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टर गणेश शेळके यांनी एक सुसाईड नोट (Suicide note) लिहिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मधील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या करंजी उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होते. दरम्यान उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणून रुजू असलेले डॉ. गणेश शेळेके हे तणावाखाली असल्याचे दिसत होते. लसीकरण सुरू असतांना त्यांनी तेथील एका कर्मचार्‍याला कागद, पेन मागितला. त्यानंतर त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा आतून दरवाजा बंद करून घेतला. पहिली नवरी पळाली अन् लग्नाच्या दिवशी दुसरीही फरार; मग नवरदेवाने उचललं असं पाऊल बराचवेळ झाल्यानंतरही डॉ. शेळके हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांना आवाज दिला. मात्र तरीही काहीही प्रतिसाद न आल्याने तेथील कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडून पाहिले. त्यावेळी डॉ. गणेश शेळके यांनी दालनातील छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून, अतिरिक्त कार्यभार देने, वेळेवर पेमेंट न करणे आणि वेळो-वेळी धमकी देने या कारणास्तव मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची खबर पाथर्डी पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झालेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात