Home /News /aurangabad /

प्रेमविवाह केल्याचा राग; तरुणाला विवस्त्र करून जमावाची मारहाण, VIDEO VIRAL

प्रेमविवाह केल्याचा राग; तरुणाला विवस्त्र करून जमावाची मारहाण, VIDEO VIRAL

औरंगाबाद जिल्ह्यात एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

    औरंगाबाद, 6 जुलै : एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण (youth striped naked and beaten by mob) करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Video viral) होत आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा (Tisgaon Tanda Khultabad) येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील एका गावातील एका तरुणीसोबत पीडित मुलाने लग्न केले. त्यानंतर या दोघांनी गाव सोडून इतरत्र राहण्यास सुरूवात सुद्धा केली होती. लग्नाला बरेच दिवस झाल्यावर ही मुलगी आपल्या घरी नातेवाईकांना भेटण्यासाठी आली. त्यावेळी या मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला पकडून वाद घालण्यास सुरूवात केली. सामान्यांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश संतप्त झालेल्या या नागरिकांनी मुलीच्या पतीला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. इतकेच नाही तर त्याचे कपडे फाडून त्याला विवस्त्र केले. यानंतर सुद्धा ग्रामस्थ शांत बसले नाहीत तर त्यांनी या तरुणाला आणखी मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांत पीडित तरुणाने 3 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्यापही कोणावरही कारवाई झालेली नाहीये.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Aurangabad, Crime, Viral videos

    पुढील बातम्या