जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / कोल्हापूर हादरलं: लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईसोबत अमानुष कृत्य, उसात आढळला मृतदेह

कोल्हापूर हादरलं: लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईसोबत अमानुष कृत्य, उसात आढळला मृतदेह

गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

लग्नासाठी मागणी घातल्यानंतर मुलीच्या आईनं लग्नास विरोध (Mother refused to daughter marriage) केल्याच्या कारणातून एका तरुणानं क्रूरतेचा कळस गाठला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

आजरा, 11 सप्टेंबर: लग्नासाठी मागणी घातल्यानंतर मुलीच्या आईनं लग्नास विरोध (Mother refused to daughter marriage) केल्याच्या कारणातून एका तरुणानं क्रूरतेचा कळस गाठला आहे. शेतात गवत आणायला गेलेल्या संबंधित महिलेवर आरोपीनं खुरप्यानं सपासप असंख्य वार (Attack with sharp weapen) केले आहेत. हा हल्ला इतका भयानक होता की, संबंधित महिला जागीच गतप्राण झाली (death) आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 11 तासांत या घटनेची उकल करत आरोपी तरुणाला गजाआड (Accused arrest) केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. लता महादेव परीट असं हत्या झालेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी आणि मृत महिला दोघंही कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथील रहिवासी आहे. आरोपी माडभगत यानं काही दिवसांपूर्वी लता परीट यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती. पण लता परीट यांना विवाहस्थळ पसंत नसल्यानं त्यांनी मुलगी देण्यास नकार देत विरोध केला. त्यामुळे आरोपी माडभगत याला मृत महिला लता परीट यांच्यावर राग होता. हेही वाचा- प्रेमप्रकरणात तरुणाला शिक्षा; नातेवाईकांनी पाळत ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End दरम्यान, शुक्रवारी मृत महिला लता या आपल्या दोन मुलांसोबत शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी शेतातील गवत कापून मुलांकडे देत, दोघांनाही घरी पाठवून दिलं. आणखी थोडं गवत कापून मीही येते असं त्यांनी मुलांना सांगितलं. महिला शेतात एकटीच असल्याची संधी साधत आरोपीनं खुरप्यानं लता यांच्या तोंडावर, मानेवर रागानं बेभान होऊन अनेक वार केले आहेत. या भयंकर हल्ल्यात लता यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे, बराच काळ होऊनही आई परत न आल्यानं मुलांनी आणि ग्रामस्थांनी लता यांची शोधाशोध सुरू केली. हेही वाचा- जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं;थरारक घटनेनं चंद्रपूर हादरलं यावेळी गावातील जनार्दन देसाई यांच्या गावंधर नावाच्या शेतातील उसात लता यांचा मृतदेह आढळून आला. आरोपीनं लता यांची हत्या करून त्यांचा मृतदेह गवत आणि उसाच्या पाचटानं लपवून ठेवला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 11 तासांत घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी त्याला आजरा येथील प्रथमवर्ग यदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं असता, न्यायालयानं आरोपी माडभगत याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात