जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं; थरारक घटनेनं चंद्रपूर हादरलं

जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं; थरारक घटनेनं चंद्रपूर हादरलं

(File Photo)

(File Photo)

Crime in Chandrapur: ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (One sided love) एका तरुणीवर चाकूनं सपासप वार (Attack with knife) केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंद्रपूर, 10 सप्टेंबर: ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून (One sided love) एका तरुणीवर चाकूनं सपासप वार (Attack with knife) केले आहेत. आरोपीनं भररस्त्यात हे धक्कादायक कृत्य केलं आहे. यानंतर आसपासच्या लोकांनी रक्तबंबाळ झालेल्या तरुणीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित मुलीचे अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. हल्ला केल्यानंतर या मार्गावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी पळून जाताना आढळला आहे. या थरारक घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हेही वाचा- प्रेमप्रकरणात तरुणाला शिक्षा; नातेवाईकांनी पाळत ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End आरोपी हा संबंधित तरुणीचा ओळखीचा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित आरोपी मागील काही दिवसांपासून पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. पण पीडित तरुणीनं त्याला नकार दिल्यानं त्यानं तरुणीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी  पोलिसांनी आरोपीला अवघ्या तीन तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तरुणीची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात