मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /...तर बाळासाहेब ठाकरे तुमच्या थोबाडीत मारतील, चंद्रकांत पाटील राऊतांवर भडकले

...तर बाळासाहेब ठाकरे तुमच्या थोबाडीत मारतील, चंद्रकांत पाटील राऊतांवर भडकले

'संजय राऊत हे नेहमी काही ना काही बोलत असता, त्यांच्यावर किती बोलावं याबद्दल मर्यादा असते'

'संजय राऊत हे नेहमी काही ना काही बोलत असता, त्यांच्यावर किती बोलावं याबद्दल मर्यादा असते'

'संजय राऊत हे नेहमी काही ना काही बोलत असता, त्यांच्यावर किती बोलावं याबद्दल मर्यादा असते'

कोल्हापूर, 30 मे: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जरा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasheb Thackery) यांच्या फोटो समोर शांतपणे बसावं आणि डोळे मिटावे आणि विचारावं तुमचं ही मत असं आहे का? तर बाळासाहेब ठाकरे हे वरतून थोबाडीत मारतील' अशी विखारी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. तसंच, 'उभ्या उभ्या मी बोलत नाही. अजितदादा (Ajit Pawar) झोपेत सरकार तुम्हीच आणलं. शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते' असा इशाराही  चंद्रकांत पाटलांनी दिला.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडी सरकार, संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

'संजय राऊत हे नेहमी काही ना काही बोलत असता, त्यांच्यावर किती बोलावं याबद्दल मर्यादा असते. उलट संजय राऊत यांनी जरा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर शांतपणे बसावं आणि डोळे मिटावे आणि विचारावं तुमचं ही मत असं आहे का? तर बाळासाहेब ठाकरे हे वरतून थोबाडीत मारतील' असा सणसणीत टोला पाटील यांनी राऊतांना लगावला.

भुवनेश्वर कुमारच्या आईची तब्येत गंभीर, काही दिवसांपूर्वीच झालंय वडिलांचं निधन

तसंच, 'उभ्या उभ्या मी बोलत नाही. अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं. शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते. अजित पवारांनी मागे काय केलं ते आठवलं पाहिजे. अजितदादा आम्ही फटके आहोत, सांभाळून बोला. कोणतीही तत्व नाहीत. कोणतंही सरकार आलं तरी मी पदावर पाहिजे असं अजितदादांचं वागणं आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.

'खासदार संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी योग्य भूमिका घेत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे', असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

लाच म्हणून स्विकारली दारूची पार्टी; मटणावर ताव मारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

'पेट्रोल डिझेल दर जागतिक बाजारपेठेत वाढलेली आहेत. इतर राज्यातील कर कमी आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीने इथला पेट्रोल डिझेल वरचा कर कमी करावा तर दर कमी होतील, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोरोनाच्या काळात आंदोलन करू नका रस्त्यावर उतरू नका अशी राज्य सरकारला पूरक भूमिका घेत असतील तर त्याला आमचा विरोध आहे. मुळात सर्वच काही सुरू आहे. बंद जरी सांगितला जात असला तरी सगळी दुकानं सुरूच आहे, असंही पाटील म्हणाले.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Shivsena, चंद्रकांत पाटील