जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भुवनेश्वर कुमारच्या आईची तब्येत गंभीर, काही दिवसांपूर्वीच झालंय वडिलांचं निधन

भुवनेश्वर कुमारच्या आईची तब्येत गंभीर, काही दिवसांपूर्वीच झालंय वडिलांचं निधन

भुवनेश्वर कुमारच्या आईची तब्येत गंभीर, काही दिवसांपूर्वीच झालंय वडिलांचं निधन

टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या आईची तब्येत कोरोनामुळे (Covid-19) गंभीर आहे. त्याच्या वडिलांचं 20 मे रोजी निधन झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे: टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या आईची तब्येत कोरोनामुळे (Covid-19) गंभीर आहे. भुवनेश्वरच्या आई इंद्रेश यांना शनिवारी रात्री बुलंदशहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भुवनेश्वर कुमार यांच्या आईला 3 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.  12 मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, तरीही तब्येतीमध्ये कोणीती सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर 21 मे रोजी त्यांचा पुन्हा एकदा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी वडिलांचे निधन भुवनेश्वर कुमारचे वडिल किरणपाल सिंह यांचे 20 मे रोजी कॅन्समुळे निधन झाले होते. ते 63 वर्षांचे होते.  किरणपाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलीस सेवेत कार्यरत होत. त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या दिल्लीतील एम्स आणि नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर घरी परतलेला भुवनेश्वरही त्यांची काळजी घेत होता. मात्र त्यांची ही झूंज अखेर अपयशी ठरली. मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर, पत्नी निर्मलबाबत हॉस्पिटलनं दिलं अपडेट भुवनेश्वर कुमारने दुखापतीनंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या वन-डे आणि टी-20 मालिकेत जोरदार पुनरागमन केले होते. त्यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. मात्र जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड निश्चित मानली जात आहे. आता घरातील नाजूक परिस्थितीमुळे तो या दौऱ्यावर जाणार का? हा प्रश्न आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात