मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बुलडाण्यात लाच म्हणून स्विकारली दारूची पार्टी; मटणावर ताव मारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

बुलडाण्यात लाच म्हणून स्विकारली दारूची पार्टी; मटणावर ताव मारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

Crime in Buldhana: बुलडाण्यात फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी केल्याबद्दल मंडल अधिकारी आणि तलाठ्याने दारू, मासांहाराची पार्टी (liquor and non veg party as bribe) लाच म्हणून स्विकारल्याची घटना समोर आली आहे.

बुलडाणा, 30 मे: कायदे कितीही कडक केले तरी सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार (Corruption) करण्याच्या नवनवीन क्लुप्त्या शोधून काढत असतात. अशातच फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी केल्याबद्दल मंडल अधिकारी आणि तलाठ्याने दारू, मासांहाराची पार्टी (liquor and non veg party as bribe) लाच म्हणून स्विकारल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या शेतात मद्य आणि मटणावर ताव मारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ (2 Officers arrested red handed) पकडलं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली असून घटनेची चौकशी केली जात आहे.

संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठ्याने फ्लॅटची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतली आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला चक्क दारू आणि मटणाची पार्टी देण्यास सांगितलं. या घटनेची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळाल्यानंतर त्यानी सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील पिंप्री घनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात ही कारवाई केली आहे.

हे ही वाचा- पैसे घेताना पकडताच पोलीस अधिकाऱ्याचा ACBकर्मचाऱ्यावर गोळीबार

विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दोन दारुच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठ्याने यापूर्वी आणखी किती जणांना अशाप्रकारे लुटलं आहे. याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime news