कागल, 04 सप्टेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कागल (kagal) याठिकाणी एका तरुणानं आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या (Son Killed Father) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं मुलानं वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहारीनं एकच वार घाव घालत त्यांची हत्या केली आहे. यानंतर मुलानं अपघाताचा बनाव (Plot as an Accident) रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी आरोपीच्या बनावाचा पर्दाफाश करत त्याला बेड्या ठोकल्या (Accused Son Arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.
दत्तात्रय रामचंद्र पाटील असं हत्या झालेल्या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते कागल तालुक्यातील केनवडे येथे आपली पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलीसोबत राहतात. मृत दत्तात्रय पाटील हे इचलकरंजी येथे कामास होते. पाटील यांना दारूचं व्यसन होतं. ते मागील बऱ्याच काळापासून दारूच्या आहारी गेले होते. दरम्यान ते सतत दारू पिऊन घरात शिवीगाळ आणि मारहाण करत असत. त्यामुळे आरोपी मुलगा अमोल दत्तात्रय पाटील आपल्या वडिलांवर चिडून होता.
हेही वाचा-भाडं मागितल्यानं भाडेकरूची सटकली; घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं
दरम्यान सोमवारी रात्री वडील केनवडे फाट्यावर गेल्याचं समजता, आरोपी अमोलनं आपल्या वडिलांच्या हत्येचा प्लॅन आखला. यावेळी वडील निढोरी रस्त्यावरील एका पुलाजवळ आले असता, आरोपी अमोलनं त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीनं जोरदार घाव घातला. या घाव इतका भयंकर होता की, दत्तात्रय यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी अमोलनं आपल्या वडिलांचा अपघात झाल्याचा बनाव रचला. एका अज्ञात वाहनानं वडिलांना धडक दिल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
हेही वाचा-एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं
पण अपघात घडल्यावर फक्त डोक्यात एकच घाव कसा लागला. अन्य ठिकाणी खरचटलं देखील नाही, यामुळे पोलिसांना मृत्यूबाबत संशय बळावला. यानंतर पोलिसांनी तपास करत अवघ्या 48 तासांत हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास कागल पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Murder