Home /News /pune /

भाडं मागितल्यानं भाडेकरूची सटकली; पिंपरीत घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं

भाडं मागितल्यानं भाडेकरूची सटकली; पिंपरीत घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं

घरभाडं मागितल्यानं (Ask Rent) संताप अनावर झालेल्या एका व्यक्तीनं घरमालकाच्या मुलाला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याची (landlords son thrown down from fourth floor) धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पिंपरी, 03 सप्टेंबर: घरभाडं मागितल्यानं (Ask Rent) संताप अनावर झालेल्या एका व्यक्तीनं घरमालकाच्या मुलाला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकल्याची (landlords son thrown down from fourth floor) धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीकडे मागील 8 महिन्यांपासून घरभाडं थकलं होतं. त्यामुळे फिर्यादी आपल्या मुलासोबत आरोपीकडे घरभाडं मागण्यासाठी गेले होते. दरम्यान बाचाबाची होऊन आरोपीनं घरमालकाच्या मुलाला टेरेसवरून खाली ढकलून दिलं आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सचिन शिवदास पोरे असं 50 वर्षीय फिर्यादीचं नाव असून ते पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शनमगर येथे राहतात. तर संबंधित संतापजनक घटनेत फिर्यादीचा मुलगा सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सुदर्शननगर येथे घडली आहे. गुरुवारी याप्रकरणी फिर्यादी घरमालक पोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-धावत्या रिक्षात निघाला साप अन्..; दिवसभर काबाडकष्ट केलेल्या मजूराचा दुर्दैवी अंत नेमकं काय घडलं? लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी विजय पाटोळे हे मागील काही दिवसांपासून फिर्यादी सचिन पोरे यांच्या इमारातीत भाडेकरू म्हणून वास्तव्याला आहेत. याठिकाणी ते आपली पत्नी एक मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दरम्यान मागील आठ महिन्यांपासून आरोपी विजय पाटोळे यांनी फिर्यादीला घरभाडं दिलं नव्हतं. त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी फिर्यादी पोरे आपला मुलगा सौरभ याला घेऊन आरोपीकडे घरभाडं मागण्यासाठी गेले. यावेळीही आरोपी पाटोळे यानं घरभाडं दिलं नाही. हेही वाचा-विदेशातील भावाचा डीपी ठेवून व्यावसायिकाला गंडवलं; अजब फंडा वापरून 4लाखांना लुटलं घरभाडं न देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यामुळे संतापलेल्या कुटुंबानं फिर्यादीला आणि त्यांच्या मुलाला टेरेसवर बोलवलं. याठिकाणी आरोपी कुटुंबानं घरमालक आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा वाद वाढल्यानंतर आरोपी विजय पाटोळे यानं फिर्यादीचा मुलगा सौरभ यास चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं आहे. या घटनेत सौरभ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pimpari, Pune

    पुढील बातम्या