मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं

एका टॅटूमुळे मारेकरी गजाआड; कल्याणमधील तलावात आढळलेल्या मृतदेहाच गूढ उलगडलं

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

Murder in Kalyan: मुंबईनजीक (Mumbai) असणाऱ्या कल्याण पूर्वेतील एका तलावात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला (dead body found in lake) होता. एका टॅटूमुळे हत्येचं रहस्य उलगडलं (tattoo revealed murder mystery) आहे.

  • Published by:  News18 Desk

कल्याण, 04 सप्टेंबर: मुंबईनजीक (Mumbai) असणाऱ्या कल्याण (kalyan) पूर्वेतील एका तलावात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला (dead body found in lake) होता. संबंधित तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना होता. मात्र, संबंधित मृत व्यक्ती नेमकी कोण? याबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती, त्यामुळे तपासात अनेक अडचणी येत होत्या. पण मृत व्यक्तीच्या हातावरील एका टॅटूमुळे अपहरण आणि हत्येचं गूढ उलगडलं (tattoo revealed murder mystery) आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना गजाआड (2 arrest) केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी गावदेवी तलावातून एका अज्ञात तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील रुग्णालयात पाठवला होता, परंतु पोलीस मृताची ओळख पटवू शकत नव्हते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगात फिरवत, मृतदेह सापडल्याची माहिती जवळच्या सर्व पोलीस ठाण्यांना दिली होती.

हेही वाचा-माथेफिरू जावयाने गाठला क्रूरतेचा कळस! सासरच्या मंडळींना जिवंत जाळलं

तसेच मृत तरुणाच्या शरीरावर 'चंदू' असं लिहिलेला टॅटू असल्याची माहितीही जवळच्या पोलीस ठाण्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांना अखेर सहाव्या दिवशी मृताची ओळख पटली आहे. संबंधित मृत तरुणाचं नाव चंद्रकांत शेलार (वय-29) असून तो नाका कामगार असल्याची माहितीही समोर आली आहे. मृत चंद्रकांत काही दिवसांपूर्वी मुंबईतील रबाळे येथून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा असून तपास सुरू होता.

हेही वाचा-मोलकरणीने रचला मालकाची तिजोरी फोडण्याचा कट, पतीसह 6 जणांनी दरोडाही टाकला पण...

टॅटूमुळे मारेकरी गजाआड

चंद्रकांतच्या शरीरावरील टॅटूनं आरोपीला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मृत तरुणाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास करत, अवघ्या काही तासांत दोन आरोपींना पकडलं आहे. तसेच ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचंही पोलिसांनी उघड केलं आहे. साजन मारुती कांबळे (26) आणि डिवाइन टेलेल घोन्साल्विस असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मृत चंद्रकांतची पत्नी आणि आरोपी साजन यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे चंद्रकांत आपल्या पत्नीवर संशय घेत नेहमी तिच्यासोबत भांडण करायचा. त्यामुळे आरोपी साजननं आपल्या साथीदाराच्या मदतीनं चंद्रकांतचं अपहरण करून त्याची हत्या केली आहे.

First published:

Tags: Kalyan, Murder Mystery