कोल्हापूर, 23 एप्रिल : कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी (Kolhapur Car Fire) जळाल्यानं मोठी गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीच्या जवळच कोणीतरी कचरा पेटवला होता. त्या कचऱ्याची आग पसरत गाडीपर्यंत गेली आणि गाडीनंही पेट घेतला. त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजुनं पूर्णपणे पेट घेतल्याचं पाहायला मिळत होतं.
कोल्हापूर शहरातल्या व्हिनस कॉर्नर परिसरात घडलेली ही घटना आहे. सध्या लॉकडाऊन असल्यानं बहुतांश दुकानं ही बंद आहेत. त्यामुळं रस्त्याच्या बाजुला कार आणि इतर गाड्या उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक कार व्हिनस कॉर्नर परिसरात उभी होती. कारच्या जवळच रस्त्याच्या कडेला असलेला कचराही पेटवला जात होता. हा कचरा पेटवल्यानंतर कचऱ्याची आग पसरत गाडीपर्यंत गेली आणि गाडीच्या मागच्या भागाला आग लागली. गाडीला आग लागल्यानंतर गाडीनं वेगानं पेट घेतला आणि मागचा भाग चांगलाच जळू लागला. गाडीला लागलेल्या या आगीचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
(हे वाचा-'अजित पवार हे कार्यक्षम मंत्री', पलटवार केल्यानंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर?)
कोल्हापुरात भर रस्त्यात पेटली गाडी. रस्त्याकडेचा कचरा पेटवण्याचा उद्योग आला अंगाशी. व्हिनस चौक परिसरातली ही घटना आहे.#Fire #Kolhapur pic.twitter.com/zfhgHRm6E1
— News18Lokmat (@News18lokmat) April 23, 2021
(हे वाचा-आसामचा हा चहा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती, आयुष मंत्रालयाची मान्यता)
सध्या एप्रिल अखेर सुरू असल्यानं सगळीकडं ऊन देखील चांगलंच वाढलं आहे. त्यामुळं अनेक भागांमध्ये चालत्या गाड्यांना आग लागल्याचे प्रकार समोर येत आहेत. कोल्हापुरातील या घटनेत गाडी उभी असली तरी जवळ आग होती आणि प्रचंड उन्हामुळे आजुबाजुचा वाळलेला कचरा पेटत गेला आणि आग गाडीपर्यंत पसरली. उन्हात गाडी गरम झालेली असल्यानं गाडीनं लगेचच आग पकडून ती पसरली असल्याचा अंदाज आहे. या व्हिडिओत गाडीचं एक टायरही आगीमुळं फुटल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning car, Fire, Kolhapur