जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आसामचा हा चहा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती, आयुष मंत्रालयाची मान्यता

आसामचा हा चहा वाढवतो रोगप्रतिकार शक्ती, आयुष मंत्रालयाची मान्यता

एका अभ्यासानुसार, नियमितपणे ग्रीन टी पिणार्‍या लोकांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

एका अभ्यासानुसार, नियमितपणे ग्रीन टी पिणार्‍या लोकांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आसामच्या चहाचा उपयोग होऊ शकतो. आसामच्या चहाच्या (Assam tea gardens) मळ्यातील या चहाची हिरवी पानं उपयुक्त ठरू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : सध्याच्या या कठीण कोरोना काळात (corona pandemic) आरोग्याची काळजी घेण अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर रोगप्रतिकारक (Immunity power) शक्तिकडे लक्ष देणही गरजेच आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यावर भर दिला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आसामच्या चहाचा (Assam tea) उपयोग होऊ शकतो. आसामच्या चहाच्या (Assam tea gardens) मळ्यातील या चहाची हिरवी पानं उपयुक्त ठरू शकतात. काळ्या पानांपासून तयार झालेला लाल चहा -

(हे वाचा - काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीसुद्धा ही चूक तर करत नाहीत ना? )

भारतात काळ्या चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत. ग्रीन टीमध्ये दुधाचा उपयोग केला जात नाही पण काळ्या चहात दुध घातलं जात त्यानंतर चहाला लालसर रंग येतो. त्यामुळे त्याला लाल चहादेखील म्हणतात. काही अभ्यासात लाल चहा शरिरातील सूज, ताप, फुफ्फुस आणि श्वसनयंत्रातील व्हायरस यांपासून संरक्षण करतो अस सांगण्यात येत. आसाममध्ये उगणारा हा काळा चहा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या चहात थिफ्लेविन्स नावाचं तत्त्व आढळतं. जे एन्फ्ल्युऐंझा आणि श्वसनासंबधी आजारांपासून वाचण्यास मदत करते. आसामच्या एका संशोधनातही हा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो असा दावा करण्यात आला आहे.

( हे वाचा - फक्त हवेवर अवलंबून राहू नका; तर आहारामार्फतही वाढवा शरीरातील ऑक्सिजन पातळी )

आयुष मंत्रालयाने दिली मान्यता (Ayush mantralaya) - कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी इम्युनिटी वाढवण गरजेचं ठरतं. कोरोना सर्वात आधी श्ववसननलिकेवरच आघात करतो. मागील काही काळापासून आयुष मंत्रालायाकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय जाहीर केले जात आहेत. जेणेकरून मोठ्या प्रमाणावर लोक याचा फायदा घेऊ शकतील. या उपायांमध्ये आयुष मंत्रालयाने काढा, तुलशीचा चहा, गरम पाणी असे घरगुती उपाय सुचवले होते. या लाल चहाचे नियमितपण सेवन केल्यास श्वसनासंबधीचे आजार लवकर शरीरावर आघात करत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात