Home /News /kolhapur /

कोल्हापूर दौऱ्यात Uddhav Thackeray आणि फडणवीसांची कानात कुजबुज; दोघांत काय झाली चर्चा?

कोल्हापूर दौऱ्यात Uddhav Thackeray आणि फडणवीसांची कानात कुजबुज; दोघांत काय झाली चर्चा?

पूरग्रस्त दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सुद्धा पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूर, 30 जुलै: 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठ्या उलथापालथी झाल्या... न भूतो न भविष्यती अशी एक महाविकास आघाडी तयार झाली आणि ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना मान मिळाला, त्यानंतर शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये शीत युद्ध सुरूच राहील, त्याची प्रचिती गेल्या वर्षभरात अनेक वेळा संपूर्ण राज्याला आली आहे, पण आज घडलं ते काही वेगळच. अतिवृष्टीमुळे महापूर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Flood) नुकसानग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत आहेत. तर राज्याते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रविण दरेकर हे सुद्धा पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. याच दरम्यान आजी-माजी मुख्यमंत्री हे कोल्हापुरात एकमेकांच्या समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही संवादही झाल्याचं दृश्यांत दिसत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात महापुराने धुमाकूळ घातला आहे आणि याच महापुराची पाहणी करायला सध्या राजकीय नेत्यांचे दौरे पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहेत. कोल्हापुरमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झाला होता. आज कोल्हापुरात विरोधी पक्षनेते दौऱ्यावर होते ज्यावेळी चिखली, आंबेवाडी या दोन गावांना विरोधी पक्षनेत्यांनी भेटी दिल्या त्यानंतर उत्तरेश्वर पेठेतील पूर परिस्थितीची पाहणी करून ते शाहूपुरी सहावी गल्लीमध्ये येणार होते आणि झालही तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते शाहूपुरी गल्लीत बरोबर 12 वाजता दाखल झाले आणि त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची चर्चाही सुरू केली. त्यावेळी मुख्य रस्त्यापासून जवळपास 50 मीटर अंतरावर भाजपचे नेते पोहोचले होते. त्याच वेळी थेट शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा कुंभार गल्लीच्या त्याच जागेवर 12 वाजून 14 मिनिटांनी आला. जिथं फडणवीस यांच्या गाडीचा ताफा लागला होता आणि मग काय ही नक्कीच राजकीय वर्तुळातील मोठी बातमी ठरली. Mumbai: डिलिव्हरी बॉयला मारहाण; शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना अटक नेमक्या त्याच वेळी फडणवीस आणि भाजपचे इतर नेते या गल्लीमधून मुख्य रस्त्याकडे येत होते आणि उद्धव ठाकरे हे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गल्लीमध्ये पुढे जात होते त्यावेळी या दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट झाली सुरुवातीला मिलिंद नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले त्यांनी फडणवीस यांच्याशी काहीतरी बोलणं केलं आणि मग फडणवीस आणि नार्वेकर एकत्रपणे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले. एकतर ज्यावेळी शाहूपुरी गल्लीत दोन्ही नेत्यांचा दौरा आहे हे समजल्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हे दोन्ही नेते एकत्र येणार का याची मोठी उत्सुकता कोल्हापूरकरांना होती आणि झालंही तसच.... हे दोन्ही नेते फक्त समोरासमोर एकत्र आले नाहीत तर दोघांनीही एकमेकांच्या कानामध्ये कुजबुजही केली. महापुराची गंभीर परिस्थिती ओळखून दोन्ही नेत्यांनी कोल्हापूरचा दौरा केला खरा, पण कानात एकमेकांना ते काय बोलले असतील याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान न्यूज एटीन लोकमतशी बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मात्र या भेटीच स्वागत केल आहे आणि केंद्राकडून निधी आणण्यासाठी ही भेट योग्य असल्याचही म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिरोळ परिसर, कोल्हापूर येथील शाहूपुरी 6वी गल्ली, गंगावेश, शिवाजी पूल परिसरातील परिस्थितीची पाहणी करत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Devendra Fadnavis, Kolhapur, Uddhav tahckeray

पुढील बातम्या