मुंबई, 30 जुलै: एका डिलिव्हरी बॉयला (Delivery boy) बेदम मारहाण केल्याचा प्रकार मुंबईत (Mumbai) घडला आहे. मुंबईतील कांदिवली (Kandivli) परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक (4 Shivsainik arrested) करण्यात आली आहे. तर इतर दोन शिवसैनिक फरार आहेत. कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी (Samata Nagar Police) या घटनेप्रकरणी सहा शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, कांदिवली पूर्व विभागात राहणारा राहुल शर्मा हा एका ई कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मंगळवारी दुपारच्या सुमारास तो पोईसर परिसरात डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्याने पोईसर शिवाजी मैदान परिसरात असलेल्या शिवसेना शाखे जवळ आसरा घेतला. लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण राहुल शर्मा थांबलेल्या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता चंद्रकांत निनवे हा दाखल झाला आणि त्याने राहुल शर्मा याच्याकडील पार्सलवर पाय ठेवला. त्यावेळी राहुल याने चंद्रकांत यांना पार्सलवरुन पाय हटविण्यास सांगितले. त्यानंतर राहुल आणि चंद्रकांत यांच्यात बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी सांगितले की, या बाचाबाचीनंतर चंद्रकांत आणि इतर शिवसैनिकांनी मिळून राहुल याला मारहाण केली. या प्रकरणी राहुल शर्मा याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून एकूण सहा शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.