मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

Car Fire: आलिशान कारची ट्रायल पडली महागात, घाटात ब्रेक न लागल्याने दगडावर आदळून कारने घेतला पेट

Car Fire: आलिशान कारची ट्रायल पडली महागात, घाटात ब्रेक न लागल्याने दगडावर आदळून कारने घेतला पेट

Representative Image

Representative Image

Car catches fire: आलिशान कारची ट्रायल घेण्यासाठी गेला आणि झालं असं काही की, गाडीला लागली आग. कोल्हापुरातील मादळे घाट परिसरात ही घटना घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

कोल्हापूर, 18 नोव्हेंबर : आलिशान कारची (Luxurious Car) ट्रायल घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. गाडीचा अपघात होऊन दगडावर आदळल्याने स्फोट झाला आणि त्यानंतर गाडीने पेट घेतला (Car catches fire). सुदैवाने गाडी चालक मेकॅनिकने गाडीनून वेळीच उडी टाकल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सादळे-मादळे घाट परिसरात हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोव्यातील सलमी अहमद हे आपल्या आलिशान गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांची गाडी बंद बडली. त्यानंतर त्यांची गाडी शिरोली मावाडी परिसरातील मेकॅनिकने दुरुस्त करणअयास घेतली. गाडी दुरुस्त झाल्यावर मेकॅनिक समीर यांनी गाडीची ट्रायल घेण्याचं ठरवलं. त्यानंतर ते गाडी घेऊन मादळे घाटात गेले असता गाडीचा ब्रेक फेल झाला.

गाडीचा ब्रेक लागत नसल्याने समीर यांनी गाडीतून उडी घेतली आणि आपले प्राण वाचवले. तर जोरदार वेगात असलेली गाडी दगडावर जोरात आदळली. गाडी इतक्या जोरात आदळळी की गाडीने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले मात्र, तोपर्यंत ही गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली होती.

वाचा : कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश

काही दिवसांपूर्वी सुद्धा स्फोट होऊन 200 मीटर दरीत कोसळली कार

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर काही दिवसांपूर्वी कारला भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला आहे. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आग लागल्याने कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारच्या शेजारी एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

कार दरीत कोसळल्यानंतर जोरदार स्फोटाचा आवाज झाला असंही स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचं कळतंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, चालत्या कारमध्ये स्फोट झाल्यानंतर हा अपघात झाला आहे की, कार दरीत कोसळून स्फोट झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.

First published:

Tags: Car, Fire, Kolhapur