मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /कोल्हापुरात भीषण अपघात, स्फोट होऊन 200 मीटर दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात, स्फोट होऊन 200 मीटर दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Kolhapur accident news: कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. एक कार थेट दरीत कोसळली आहे.

  कोल्हापूर, 12 नोव्हेंबर : एक भीषण अपघात कोल्हापुरात (car accident in Kolhapur) झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात (accident at Kagal Murgud road) झाला आहे. अपघातानंतर गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू (one died in accident) झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

  मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई घाडात हा अपघात झाला आहे. सकाळी धावत्या कारमध्ये एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली असं बोललं जात आहे. यामुळे कारने पेट घेतला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  आग लागल्याने कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारच्या शेजारी एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. हा मृतक व्यक्ती कोण आहे याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. होरपळून मृत्यू झाल्याने मृतकाची ओळख पटवण्यास अडचणीत येत आहेत.

  शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली असल्याचं बोललं जात आहे. कार दरीत कोसळल्यानंतर जोरदार स्फोटाचा आवाज झाला असंही स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचं कळतंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

  दरम्यान, चालत्या कारमध्ये स्फोट झाल्यानंतर हा अपघात झाला आहे की, कार दरीत कोसळून स्फोट झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये.

  पाच दिवसांपूर्वी माळशेज घाटात भीषण अपघात

  कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटात एका कारला पाच दिवसांपूर्वी भीषण अपघात (Car accident) झाला होता. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून कार थेट दरीत कोसळली (car crash into valley) आहे. या दुर्दैवी घटनेत एक महिलेचा जागीच मृत्यू (Woman died in accident) झाला. तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले होते. कार दरीत कोसळल्यानंतर कारने पेट घेतल्याचं देखील प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. मोरोशी येथील भैरवगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही औरंगाबादच्या तरुणांनी जखमींना बाहेर काढलं आहे. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना देण्यात आली आहे.

  संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या 55 वर्षीय महिलेचं नाव सखुबाई उगले असं आहे. तर उषा सूर्यकांत कोकणे, उर्मिला चंद्रकांत लागे, पांडुरंग नामदेव मिलखे, सोनाली गणेश काटे, ऋषीकेश सूर्यकांत कोकणे आणि चालक आकाश शंकर गेगजे असं जखमी झालेल्यांची नावं आहेत. संबंधित सर्व जखमींना उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती टोकावडे पोलिसांनी दिली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Accident, Kolhapur