मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

BREAKING: कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश

BREAKING: कोल्हापुरात फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना, हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश

Crime in Kolhapur: 72 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime in Kolhapur: 72 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime in Kolhapur: 72 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर, 17 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड (Chandgad) तालुक्यातील ढोलगरवाडी (Dholgarwadi) याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीस ठाण मांडून बसले आहेत. पोलिसांनी ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर छापा (Mumbai police raid at farm house) टाकला असून गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. 72 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक (one accused arrested) केली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा (High profile lawyer) समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित कारवाईबाबत पोलिसांनी सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता बाळगली होती. तीन दिवस झडती घेतल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ढोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर पशुपालनाच्या आड एमडी नावाचा ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू होता. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित वकिलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

नेमकं प्रकरण काय आहे?

अलीकडेच, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाकडे एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर एमडी नावाचा अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीसांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली असून हाय प्रोफाइल ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

हेही वाचा-सासरच्या छळानं घेतला बापलेकीचा जीव;पित्याच्या आत्महत्येनंतर मुलीनंही सोडला प्राण

ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर म्हशी, घोडे आणि कोंबड्याचं पशुपालन केल्याचं चित्र स्थानिकांसमोर उभं केलं होतं. त्यामुळे पशुपालनाच्या आड सुरू असलेल्या काळ्या कृत्याचा गावकऱ्यांना देखील सुगावा लागला नाही. पण मुंबईत एका महिला पेडलरला अटक झाल्यानंतर, संबंधित रॅकेट उघडकीस आलं आहे. या प्रकरणी आखणी बड्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Drugs, Kolhapur