मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली प्रतिष्ठित Chevening स्कॉलरशिप!

Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली प्रतिष्ठित Chevening स्कॉलरशिप!

लोणार तालुक्यातल्या छोट्या गावात शिकलेल्या राजू केंद्रेसारख्या विद्यार्थ्याला ही जागतिक शिष्यवृत्ती मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राजूच्या घरात शिक्षण घेतलेली त्याची पहिलीच पिढी. वाचा Success Story

लोणार तालुक्यातल्या छोट्या गावात शिकलेल्या राजू केंद्रेसारख्या विद्यार्थ्याला ही जागतिक शिष्यवृत्ती मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राजूच्या घरात शिक्षण घेतलेली त्याची पहिलीच पिढी. वाचा Success Story

लोणार तालुक्यातल्या छोट्या गावात शिकलेल्या राजू केंद्रेसारख्या विद्यार्थ्याला ही जागतिक शिष्यवृत्ती मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राजूच्या घरात शिक्षण घेतलेली त्याची पहिलीच पिढी. वाचा Success Story

    मुंबई, 7 जुलै:  समाजात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि तळागाळातील पहिल्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न उराशी बाळगत राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे आता पुढचे शिक्षण घ्यायला लंडनला (London) जाईल. 28 वर्षांचा राजू केंद्रे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या पिंप्री ( खंदारे ) ह्या छोट्याच्या खेड्यातला तरुण. दहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमातूनच शिक्षण पूर्ण केलं आणि आता जगात प्रतिष्ठत मानल्या गेलेल्या British Chevening Scholarship साठी राजूची निवड झाली आहे.

    काय आहे स्कॉलरशिप?

    भविष्यात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या आणि तशी कुवत असलेल्या जगातील युवकांना ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचा acceptance rate केवळ 1.5% एवढा आहे. ही शिष्यवृत्ती साधारणपणे 45 लाख रुपयांपर्यंत असून युनायटेड किंग्डम (UK) मध्ये अभ्यास करण्याच्या सर्व खर्चाचा समावेश करते. ज्यांना युकेमध्ये शिक्षण घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्या भूमीत परत यायचे आहे अश्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते.

    राजू केंद्रेसारख्या ग्रामीण भागातून शिकलेल्या विद्यार्थ्याला ही जागतिक शिष्यवृत्ती मिळणं ही मोठी गोष्ट आहे. राजूच्या घरात शिक्षण घेतलेली ही पहिलीच पिढी. पदवीधर होणारा हा पहिलाच. त्यातून राजू हा भटक्या जमातीतील आहे. आता खऱ्या अर्थाने तो भारताचे प्रतिनिधित्व करत लंडनला जाणार आहे. आदिवासी, दलित, भटके, गरीब कुटुंबातील मुलांना पुढे आणण्याचे शिक्षण हे एकमेव साधन आहे, असा विश्वास राजू व्यक्त करतो.

    राजू म्हणतो, ‘माझा युकेपर्यंतचा प्रवास माझ्यासारख्या सर्व First Generation Learners ना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हे मला पक्के माहित आहे. संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाची, मार्गदर्शकांची, मित्रांची आणि महत्वाचे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांची साथ मला मिळाली आहे. त्या सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद म्हणायचंय, आणि सर्वांचं अभिनंदन करायचं आहे, कारण ही स्कॉलरशिप माझ्या एकट्याची नाहीये, हजारो लाखो फर्स्ट जनरेशन लर्नर्स ला ही स्कॉलरशिप मी समर्पित करतोय!'

    एकलव्य संस्थेमार्फत योगदान

    तळागाळातील मुलांच्या प्रगतीसाठी यवतमाळमध्ये त्याने सहकार्यांसह एकलव्य ह्या संस्थेची स्थापना केली.

    विद्यार्थ्यांनो, Google मध्ये इंटर्नशिप करायची आहे? मग फॉलो करा या टिप्स

    जास्तीत जास्त लोकांनी उच्च शिक्षण घेतल्यास आपल्या देशाच्या विकासात त्याचे योगदान भरपूर असेल असे राजूला वाटते. तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी एकलव्यच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग सुरु केले. भारतातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास मार्गदर्शन आणि विकासाच्या तसेच सामाजिक क्षेत्रात तळागाळातील नेतृत्व निर्माण करण्यासाठी एकलव्य प्रयत्नशील असते.

    परदेशात शिक्षणासाठी जायचा निर्णय

    सकारात्मक दृष्टीकोन उराशी बाळगून कोणत्याही प्रकारच्या आव्हानाचा सामना करण्याची आणि आपले स्वप्ने पूर्ण करण्याची खास क्षमता राजूत आहे. तो स्वप्न पाहणे कधी थांबवत नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यानी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. भरपूर मेहनत घेतली आणि जगातील पहिल्या 18 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली. पण समोर आर्थिक बाजूचा प्रश्न होता. परदेशात जाण्यासाठी त्याला सुमारे 45 लाखांची गरज होती. त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले कि, जरी आपण आपली सगळी जमीन विकली तरीदेखील आपण एवढे पैसे गोळा करू शकत नाही. बँकसुद्धा आपल्याला कर्ज देऊ शकत नाही. त्यामुळे आपण शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करू या, असं त्याने ठरवलं. या स्कॉलरशिपसाठी 10 महिने प्रयत्न करत राहिला. आणि अखेरीस, 29 जून 2021 रोजी, त्याला ब्रिटीश सरकारची सर्वात प्रतिष्ठित अशी chevening स्कॉलरशिप मिळाली.

    या प्रश्नाच्या उत्तराने जिंकली स्कॉलरशिप

    या स्कॉलरशिप च्या इंटरव्ह्यू दरम्यान पॅनेल ने राजु ला शेवटचा प्रश्न विचारला,  तुझी या स्कॉलरशिप साठी निवड झाली नाही तर काय करशील?  "माझं नाही झालं तरी पुढच्या 10 वर्षांत 10 एकलव्य शेव्हनिंग स्कॉलर्स असतील." हे त्याचं उत्तर होतं.

    स्पर्धा परीक्षेसाठी केले होते प्रयत्न

    दहावीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत त्याने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्याला अमरावतीच्या मेळघाट भागात जाण्याची संधी मिळाली. मैत्री नावाची स्वयंसेवी संस्था दरवर्षी पावसाळ्यात मेळघाटमधील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी धडक मोहिमेचे आयोजन करते. सुरुवातीला स्वयंसेवक म्हणून आणि आता मेळघाट मित्र म्हणून काम करत राजूने महाराष्ट्रभरातून हजारो स्वयंसेवकांचे एक नेटवर्क तयार केले आहे.

    MPSC Special: कोरोनानं हिरावलं पालकांचं छत्र; नियुक्तीही नाही; मग जगायचं कशासाठी

    स्पर्धा परीक्षा देऊन भविष्यात सामाजिक बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहत असताना तो वर्तमानातील प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचे त्यांनी ठरवले आणि अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न नैसर्गिक रित्याच गळून पडले.

    TISS तुळजापूर येथे ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याने ग्रामपरिवर्तन चळवळीद्वारे स्वतःच्या गावातच काम करायचे ठरवले. त्याद्वारे त्याला थेअरीचे ज्ञान प्रत्यक्षात आणायचे होते. २०१५ मध्ये त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरवले. आपल्या गावाचा जाहीरनामा बॉंड पेपरवर बनवला आणि तो गावकऱ्यांना दिला. पण प्रस्थापित राजकीय समाजाने त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आणि तो निवडणूक हरला. बरेच अडथळे होते पण त्यातूनही तो शिकत होता.

    तुमच्या आवडत्या कंपनीमध्ये जॉब हवाय? मग या महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका

    राजूने महाराष्ट्र शासनाचा रुरल डेव्हलपमेंट फेलो म्हणून काम केलेले आहे. त्या काळात त्याने पारधी समाजासाठी विकासकामे केली. लोकसहभागातून त्याने यवतमाळ येथील पारधी बेडा भागात काम केले. त्याच्या कार्याची दाखल महाराष्ट्र सरकारने घेतली.

    वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी त्याने यवतमाळमध्ये बुक कलेक्शन ड्राईव्ह सुरु केले. नंतर त्याने अमरावती, मुंबई , पुणे येथून ३०००० हून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागातील ग्रंथालयांमध्ये वितरीत केली.

    एकलव्यची स्थापना

    विकासाच्या क्षेत्रात तळागाळातील  तरुणांचे नेतृत्व उभे करण्यासाठी राजूची एकलव्य संस्था प्रयत्न करते. आदिवासी, मजूर , स्थानिक ग्रामीण भागातले पहिल्या पिढीतील पदवीधर आणि शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना वर येणाऱ्या वंचित तरुणांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण एकलव्य देते. भारतातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

    शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; परीक्षेत अपयश आल्यानंतर असं केलं टार्गेट पूर्ण

    शिक्षण हे एकमेव साधन आहे जे त्यांना मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्यास मदत करेल अशी खात्री एकलव्य संस्थेला आहे. उत्तम नेतृत्व करण्यासाठी ज्ञान आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज आहे. गेल्या चार वर्षात एकलव्यने उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि फेलोशिप प्रोग्राममध्ये 125 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाठवण्यात यश आलेले आहे. एकलव्य चळवळ आता संपूर्ण भारतभर पसरली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Buldhana news, Inspiration, Inspiring story, Lonar, Scholarship, Success story