मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC टॉपर अक्षत जैन यांनी दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश; जाणून घ्या त्यांची Study Strategy

UPSC टॉपर अक्षत जैन यांनी दुसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश; जाणून घ्या त्यांची Study Strategy

अक्षत यांचे आई-वडील दोघेही सिव्हिल सर्विसमध्ये आहेत.

अक्षत यांचे आई-वडील दोघेही सिव्हिल सर्विसमध्ये आहेत.

सिव्हिल सर्विसमध्ये असलेल्या आपल्या पालकांकडूनच UPSC परीक्षेसाठी प्रेरणा मिळाली. IAS ऑफिसर अक्षत जैन यांनी कसा केला अभ्यास?

नवी दिल्ली, 09 जुलै : UPSC परीक्षेत (UPSC Exam) टॉपर राहिलेले अक्षत जैन यांनी 2017 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 3 महिन्यांमध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात केवळ 2 मार्कांमुळे ते पास होऊ शकले नाहीत. मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी पूर्ण तयारी केली. 2018 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि इतिहास रचला. या प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षेत (UPSC Exam) दुसरा रँक मिळवमारे आएएस ऑफिसर अक्षत जैन यांनी परिक्षेचा अभ्यास स्वतः केला. फक्त ऍन्थ्रोपोलॉजी या विषयासाठी त्यांनी कोचिंग क्लासची मदत घेतली.

अक्षत यांचे आई-वडील दोघेही सिव्हिल सर्विसमध्ये आहेत.त्यांच्याकडूनच त्यांना UPSC परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. अक्षत यांच माध्यमिक शिक्षण जयपूरच्या इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये (India International School,Jaipur) झालं आहे. त्

(OMG! दाढी आहे की 'टॉयलेट सीट' ? लॉकडाऊनमध्ये पुरूषांनी बदलली फॅशन)

यानंतर गुवाहाटी आयआयटीमध्ये (Guwahati IIT) त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर बेंगळुरूच्या सॅमसंग इन्स्टिट्यूटमध्ये कामही केलं.

(या साईटवरुन प्रसिद्ध सेलिब्रिटी कमवतात कोट्यवधी, एका फोटोने झाली करोडोंची कमाई)

यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षत त्यांनी अतिशय महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. परीक्षेची तयारी करण्याआधी सिल्याबसची पूर्ण माहिती करून घ्यायला हवी असं अक्षत सांगतात. अक्षत त्यांनी UPSCच्या परीक्षेसाठी मेन्स आणि त्यानंतर प्रीलियम असा अभ्यास केला.

(युथ आयकॉन IAS आर्मस्ट्रॉंग पेम; कर्तृत्वाने मिळवली ‘मिरॅकल मॅन’ उपाधी)

शॉर्ट नोट्स तयार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला. त्यामुळे रिविजन करताना फायदा होतो असं ते सांगतात. याशिवाय उत्तर लिहिण्याची देखील त्यांनी प्रॅक्टिस केली होती. स्वतः लिहिलेली उत्तर आणि टॉपर्स यांनी लिहिलेली उत्तर यांची तुलना करून ते अभ्यास करत होते. अक्षय यांनी अवांतर वाचनावर भर दिला. पेपर वाचून त्यावरून देखील त्यांनी नोट्स तयार केल्या.

First published:
top videos

    Tags: Inspiring story, Success stories, Success story, Upsc