कोल्हापूर, 4 मे: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Strict lockdown in Kolhapur) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार आता 5 मे 2021 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून ते 13 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू असणार आहे. या काळात जनता कर्फ्यू (Janata curfew) म्हणजेच संचारबंदी लागू असणार आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यास काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार या संदर्भात नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रशासनाने या संदर्भातील नियमावली जाहीर केली असून काय सुरू राहणार, काय बंद राहणार तसेच दुकाने सुरू राहण्याची वेळ काय असेल या संदर्भात माहिती दिली आहे.
Lockdown लागताच दिसला खास कोल्हापुरी ठसका; कोल्हापूरकरांची नेतेमंडळींविरोधात स्टेटसबाजी पाहा
अशी आहे नियमावली
नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
वैध कारण असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये.
वैद्यकीय सुविधा व सेवा पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात.
अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इत्यादी दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.
सांगलीपाठोपाठ आता कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन
हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.
अत्यावश्यक, निर्यात व निरंतर प्रक्रिया उद्योग अस्थापना यापूर्वी दिलेल्या नियंत्रणास बांधील असतील.
शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे सुरू ठेवावीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Kolhapur, Lockdown