कोल्हापूर, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (maharashtra corona case) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. सांगलीपाठोपाठ (Sangali) आता कोल्हापूरमध्ये (Kolhapur Lockdown) सुद्धा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून कडक लॉकडाऊन लागणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली आहे. पुढील 10 दिवसांसाठी नियमावली आजच जारी केली जाणार आहे. राज्यात सध्या 15 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर आता जिल्हा पातळीवर कडक लॉकडाऊन लावले जात आहे.
सांगलीत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन
तर, सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 568 वर पोहोचली असून सोमवारी 40 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
PUBG Mobile ची लवकरच भारतात होणार एन्ट्री; नव्या नावासह रिलाँच होणार गेम
जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा' असे आवाहनही जयंत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: कोल्हापूर