गोकूळ दूध संघाची निवडणूक होताच लॉकडाऊन जाहीर झाला आहे. यानंतर कोल्हापूरकरांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.
लॉकडाऊन लावण्याची घोषणा होताच कोल्हापूरकरांनी आपल्या खास शैलीत व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचं पहायला मिळत आहे.
अभिनेते शूटिंग करत आहेत, नेते निवडणूक लढवत आहेत, खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि कोरोनाला हरवण्यासाठी माणूस घरी बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना फक्त गोकूळ निवडणुकीसाठी थांबला होता, आता उद्यापासून तो पुन्हा जोमात सक्रिय होणार...
उद्यापासून बाहेर पोलिसांनी अडवले तर अभिमानाने सांगायचे गोकूळ दूध आणायला निघालोय. अत्यावश्यक निवडणूक, मतबली राजकारण..