मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /संशयाने केला कुटुंबाचा सर्वनाश; पहाटे पत्नीचा दोरीनं आवळला गळा अन्...

संशयाने केला कुटुंबाचा सर्वनाश; पहाटे पत्नीचा दोरीनं आवळला गळा अन्...

कोमल निशिकांत चव्हाण असं हत्या झालेल्या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

कोमल निशिकांत चव्हाण असं हत्या झालेल्या 25 वर्षीय महिलेचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कणेरी याठिकाणी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं दोरीने गळा आवळून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife Brutal murder) केली आहे.

करवीर, 17 सप्टेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कणेरी याठिकाणी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं दोरीने गळा आवळून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife Brutal Murder) केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न (Husband attempts to commits suicide) केला आहे. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपी पतीला अटक (Accused husband arrest) केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोमल निशिकांत चव्हाण असं हत्या झालेल्या 25 वर्षीय महिलेचं नाव असून त्या करवीर तालुक्यातील कणेरी येथील रहिवासी आहेत. तर निशिकांत सुरेश चव्हाण (वय-30) याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीच्या खुनानंतर आरोपीनं स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कोमल यांचा  2014 साली नात्यातीलच निशिकांत यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलही आहेत.

हेही वाचा-जीवापेक्षा मोबाइल ठरला महत्त्वाचा; सिंधुदुर्गात 17 वर्षीय मुलीचा हृदयद्रावक शेवट

पण निशिकांत आणि कोमल यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. अगदी छोट्याशा कारणावरूनही दोघांत वादाला सुरुवात व्हायची. मृत कोमल हिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय निशिकांतला होता. यातूनच निशिकांतने गुरुवारी रात्री पत्नी कोमलशी वाद घातला होता. याच वादातून निशिकांतने गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोमलचा दोरीने गळा आवळून खून केला आहे.

हेही वाचा-आधी तोंडात बोळा कोंबला मग..; प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईनं निर्दयीपणे संपवलं

पत्नीची हत्या केल्यानंतर घाबरलेल्या निशिकांतने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Murder