मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आधी तोंडात बोळा कोंबला मग...; प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याला आईनं निर्दयीपणे संपवलं

आधी तोंडात बोळा कोंबला मग...; प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकल्याला आईनं निर्दयीपणे संपवलं

Murder in Jalna: जालन्यातील एका महिलेनं आई आणि बाळाच्या नात्याला कलंक फासला आहे. विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affair) अडथळा ठरतो म्हणून आईनं प्रियकराच्या मदतीनं चिमुकल्याचा काटा काढला आहे.

जालना, 16 सप्टेंबर: आई आणि बाळाचं नातं जगातील सर्वात मजबूत नातं मानलं जातं. आपल्या बाळावर एखादं संकट आलं तर आई स्वत:चा प्राण धोक्यात घालून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. पण जालन्यातील (Jalna) एका महिलेनं आई आणि बाळाच्या नात्याला कलंक फासला आहे. विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affair) अडथळा ठरतो म्हणून आईनं प्रियकराच्या मदतीनं चिमुकल्याचा काटा (mother killed 6 years old son with help of boyfriend) काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शीतल उघडे आणि नवनाथ जगधने असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. दोघंही जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डावरगाव येथील रहिवासी आहेत. आरोपी आई शीतल हिच मागील काही दिवसांपासून आरोपी नवनाथसोबत विवाहबाह्य संबंध सुरू होते. पण शीतलचा 6 वर्षांचा मुलगा या दोघांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपी आईनं आपल्या पोटच्या लेकाची हत्या करण्यासाठी प्रियकर आणि त्याच्या अन्य एका मित्राच्या हवाली केलं आहे.

हेही वाचा-विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं

आरोपी प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याचा एका मित्र 6 वर्षीय चिमुकल्याला अंबड-घनसावंगी रस्त्यावर घेऊन गेले. याठिकाणी कोणी पाहात नसल्याची पाहून आरोपीनीन चिमुकल्याच्या तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर चिमुकल्याला काही कळायच्या आत आरोपींनी निर्घृणपणे त्याची हत्या केली आहे.

हेही वाचा-'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर  अंबड पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या खूनाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी आरोपी आई शीतल उघडे, तिचा प्रियकर नवनाथ जगधने आणि त्यांच्या अन्य एका साथीदाराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder