Home /News /maharashtra /

जीवापेक्षा मोबाइल ठरला महत्त्वाचा; सिंधुदुर्गात 17 वर्षीय मुलीने केला हृदयद्रावक शेवट

जीवापेक्षा मोबाइल ठरला महत्त्वाचा; सिंधुदुर्गात 17 वर्षीय मुलीने केला हृदयद्रावक शेवट

एका 17 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

एका 17 वर्षीय तरुणीनं घरात एकटी असताना, ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. (File Photo)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा (Minor girl commits suicide) शेवट केला आहे.

    वैभववाडी, 16 सप्टेंबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीनं हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पीडितेनं बुधवारी दुपारी घरात कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या (Minor girl commits suicide) केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. साक्षी दीपक सोनुले असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. ती वैभववाडी बाजार पेठ येथील रहिवासी आहे. मृत साक्षी ही मागील काही दिवसांपासून अवास्तव मोबाइलचा वापर करत होती. त्यामुळे तिचा घरच्यांशी वाद झाला होता. त्यामुळे साक्षीचे वडील दीपक सोनुले यांनी साक्षीच्या मोबाइल वापरण्यावर निर्बंध घातली. तसेच तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल वापरण्यावर निर्बंध घातल्यानं साक्षीला राग आला होता. हेही वाचा-विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं याच रागातून साक्षीने बुधवारी दुपारी घरात कोणी नसताना, घराच्या छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. कामानिमित्त बाहेर गेलेली घरातील मंडळी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचं दिसून आलं. यामुळे त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी साक्षीला हाक दिली. पण तिने घरातून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे साक्षीचे वडील दीपक यांनी खिडकीतून डोकावून घरात पाहिलं असता, साक्षीचा मृतदेह घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकल्याचा दिसून आला. हेही वाचा-'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केवळ मोबाइल वापरावर पालकांनी निर्बंध लावल्यामुळे मुलीनं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरात मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर मृत मुलीचे वडील दीपक सोनुले यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sindhudurg, Suicide

    पुढील बातम्या