कोल्हापूर, 16 नोव्हेंबर: सोशल मीडियावरील बायकोचे फोटो मॉर्फ करून त्याचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात (Kolhapur) घडली आहे. संबंधित एडिट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी (Threat to viral porn video) देत, आरोपीनं मोबाइल कंपनीतील एका कर्मचाऱ्याकडून 45 हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी फिर्यादीनं कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शोध सुरू आहे.
राहूल यादव असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तर फिर्यादी तरुण हा एका मोबाइल कंपनीच्या फायबर ऑप्टिकलमध्ये नोकरीस आहेत. फिर्यादीचं आणि त्याच्या पत्नीचं फेसबुकवर अकाऊंट आहे. याचा फायदा घेऊन आरोपीनं फिर्यादीकडून सुमारे 45 हजार रुपये उकळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी राहूल यादव याचा फिर्यादीला फोन आला होता. यावेळी संशयित आरोपी राहूल यादव याने आमच्याकडे सेक्स करण्यासाठी महिला उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कळवा, असं सांगितलं.
हेही वाचा-Shocking! लग्नाच्या तयारीदरम्यानच प्रेमी युगुलाने घेतला शेवटचा श्वास
त्याचबरोबर आरोपीनं काही तरुणींचे फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. यानंतर काही वेळाने आरोपीनं फिर्यादीला पुन्हा फोन करून तुम्हाला आवडेलली मुलगी बुक केली आहे. तसेच हॉटेलमधील रुमही बुक केली आहे, असं सांगितलं. तसेच पेमेंट करण्यासाठी पेटीएम नंबरही पाठवला. यावर फिर्यादीनं आपण कोणतीही मुलगी बुक केली नसल्याचं सांगितलं. पण आरोपीनं फिर्यादीचं ऐकून न घेता, हॉटेल बुक केल्याचे 15 हजार रुपये पाठवा असं सांगितलं. पण फिर्यादीनं पैसे पाठवण्यास नकार दिला.
हेही वाचा-पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; तरुणाने पत्नीला दिला भयावह शिक्षा
यामुळे आरोपीनं फिर्यादीच्या बायकोचे फोटो सोशल मीडियावरून घेऊन, संबंधित फोटो पॉर्न व्हिडीओमध्ये मॉर्फ केले. आरोपीनं संबंधित व्हिडीओ फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 45 हजार रुपये उकळले आहेत. 45 हजार रुपये देऊनही आरोपीचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे फिर्यादीनं अखेर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur