Home /News /kolhapur /

अजितदादा, झोपेत सरकार तुम्हीच आणलं, सांभाळून बोला, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

अजितदादा, झोपेत सरकार तुम्हीच आणलं, सांभाळून बोला, चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा

'शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते. अजित पवारांनी मागे काय केलं ते आठवलं पाहिजे'

कोल्हापूर, 30 मे: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता तर 'झोपेत तुम्ही सरकार आणलं आहे, त्यावेळी शरद पवार सुद्धा झोपेतच होते, आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, त्यामुळे सांभाळून बोला', असा इशाराच चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना दिला. महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर चंद्रकांत पाटील झोपेत असताना बोलले असतील, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावला. त्यानंतर आज कोल्हापूरमध्ये पत्रकाराशी बोलत असताना चंद्रकांतदादांनी जोरदार पलटवार केला. मेहुल चोक्सीला मायदेशी आणण्यासाठी भारतानं उचललं 'हे' मोठं पाऊल 'उभ्या उभ्या किंवा मी झोपेत बोलत नाही. अजितदादा झोपेत सरकार तुम्हीच आणलं होतं. शपथविधीला तुम्हाला काय तलवारीच्या धाकावर नेलं नव्हतं. तीन दिवसांचे भाजप सरकार स्थापन केले होते, त्यावेळी मांडीला मांडी लावून बसला होता. त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान पवारांनी बाळगावे. त्यावेळी शरद पवार हेही त्यावेळी झोपेत होते. पण, 28 आमदार हे परत माघारी परतले, यात अजितदादांचा दोष आहे. अजित पवारांनी मागे काय केलं ते आठवलं पाहिजे. अजितदादा आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, सांभाळून बोला. कोणतीही तत्व नाहीत. कोणतंही सरकार आलं तरी मी पदावर पाहिजे असं अजितदादाचं वागणं आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. संजय राऊत यांना टोला 'संजय राऊत हे नेहमी काही ना काही बोलत असता, त्यांच्यावर किती बोलावं याबद्दल मर्यादा असते. उलट संजय राऊत यांनी जरा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर शांतपणे बसावं आणि डोळे मिटावे आणि विचारावं तुमचं ही मत असं आहे का? तर बाळासाहेब ठाकरे हे वरतून थोबाडीत मारतील' असा सणसणीत टोला पाटील यांनी राऊतांना लगावला. कोरोना काळातही पोलिसांचा खिसा गरमच; पुण्यात 5 महिन्यांत 21 लाचखोरीच्या घटना उघड खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वच राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. विरोधकांशीही चर्चा केली. जर ते मराठा आरक्षणासाठी योग्य भूमिका घेत असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ajit pawar, BJP, Chandrakant patil, NCP, अजित पवार, चंद्रकांत पाटील

पुढील बातम्या