• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच; पुण्यात 5 महिन्यांत 21 लाचखोरीच्या घटना उघड

कोरोनाच्या काळातही पोलिसांचा खिसा गरमच; पुण्यात 5 महिन्यांत 21 लाचखोरीच्या घटना उघड

Crime in Pune: एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या लढ्यात व्यग्र असताना, देशात लाचखोरी आणि काळाबाजारीच्या (Bribe and black market) घटनांना उत आला आहे.

 • Share this:
  पुणे, 30 मे: गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने (Corona virus) देशाला वेठीस धरलं आहे. दरम्यानच्या काळातील दोन-तीन महिने वगळता मागील दीड वर्षापासून देशात सातत्याने लॉकडाऊनची (Lockdown) अंमलबजावणी केली जात आहे. संपूर्ण देशाला कोरोना विषाणूने ग्रासलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या लढ्यात व्यग्र असताना, देशात लाचखोरी आणि काळाबाजारीच्या (Bribe and black market) घटनांना उत आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील दोन महिन्यात लाचखोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. ज्यांना कोरोना योद्धे म्हणून नावाजलं गेलं. याच दोन विभागात सर्वाधिक लाचखोरी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. मागील दोन महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. असं असतानाही पुणे शहरात आणि जिल्ह्यात लाचखोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्ह्यांत एकूण 21 कारवाया केल्या आहेत. सापळा रचून केलेल्या कारवाईत अद्याप 30 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे ही वाचा-Vasai : पोलिस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, टाटांशी संबंध असल्याच्या करायचा बाता देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरात आणि जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मागील पाच महिन्यात सर्वाधिक लाचखोरी पुण्यात झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पुणे जिल्ह्यातील 21 सापळा कारवायांपैकी 8 सापळा कारवाया पुणे शहरात झाल्या आहेत. कोरोना काळात लाचखोरी करण्यात पुणे पोलीस आघाडीवर असले तरी आरोग्य विभागही फारसं पाठिमागे नाही. हे ही वाचा-लाच म्हणून स्विकारली दारूची पार्टी; मटणावर ताव मारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक एकीकडे पोलीस आणि डॉक्टर आघाडीचे कोरोना योद्धे म्हणून आपली सेवा बजावत असताना, यातीलचं काहीजणांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार केला आहे. वैद्यकीय उपचार मोफत असतानाही अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून विविध कारणं देत पैसे उकळले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय साधनांची काळाबाजारी करण्यात सर्वात पुढे  वैद्यकीय कर्मचारीचं होते.
  Published by:News18 Desk
  First published: