नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते, तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि कठीण काळ असतो. नैराश्यामुळे अनेकजण जीवनापासून दूर होऊन मृत्यूला कवटाळतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नैराश्य येते तेव्हा त्याचे दुःख त्यालाच जाणवू शकते. बाहेरून पाहणाऱ्या तुम्हा-आम्हाला हे दुःख फक्त पाहुन जाणवू शकत नाही. खरे तर निराश व्यक्तीला लोकांच्या मदतीची गरज असते. नैराश्यग्रस्त व्यक्तीला वेळीच मदत करण्यासाठी पुढे आलात तर त्यांना आत्महत्येच्या विचारापासून दूर ठेवता येईल. डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांची आपण कशी मदत करू शकतो, याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून (World Suicide Prevention) घेऊया. संपर्क ठेवा, त्यांच्याशी बोलत राहा - हेल्थलाइन च्या माहितीनुसार, नैराश्यग्रस्त व्यक्तीशी जमेल तितके बोला. तो त्याची चिंताही तुमच्याशी शेअर करेल. त्यांच्या मनात काय चालले आहे, हे त्याला नेकेपणाने खोदून विचारा. जर त्याने तुमच्याशी दु:ख शेअर केले तर तो बर्याच प्रमाणात मनाने हलका होईल. त्याच्यावरील तणाव कमी होईल. त्यांना एकटे वाटू देऊ नका - कदाचित तुमचा एखादा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य नैराश्यग्रस्त असेल. अशा परिस्थितीत तुम्ही त्याच्यासोबत असल्याची जाणीव त्याला करून द्या. नैराश्याच्या काळात एकटेपणाची भावना धोकादायक ठरू शकते. उपचार घेण्यास तयार करा - जर तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तर ती डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि काही प्रकारचे उपचार घेण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला साथ देता. त्यांना कायमस्वरूपी चांगली थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहित करा, मदत करा. हे वाचा - सोशल मीडियावर भावनेच्या आहारी जाणं पडेल महागात, तरुणांनी घ्यायला हवी ‘ही’ काळजी विशेष काळजी घ्या - जर तुम्ही डिप्रेशमध्ये असलेल्या व्यक्तीची काळजी घेतली तर तो सुद्धा आपले त्रास आणि चिंता वाटणाऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू लागतो. त्याच्याशी बोलण्यासाठी तुम्ही सदैव उपस्थित आहात, असा त्याला विश्वास द्या. आत्महत्येसारखा घातक विचार त्याच्या मनात येऊ नये म्हणून त्याला बोलतं करा. हे वाचा - भारतातील खडतर प्रवास बाईकने पूर्ण करणारी पहिली तरुण मुलगी म्हणते.. रोजच्या कामात मदत करा नैराश्याने जगणे प्रत्येक माणसासाठी खूप कठीण असते. कपडे धुणे असो किंवा खरेदी असो, तुम्ही त्या व्यक्तीला रोजच्या छोट्या कामात मदत करता, जेणेकरून त्याला एकटे वाटू नये आणि वाईट विचार त्याच्या मनात येऊ नयेत. तुमचा छोटासा प्रयत्न निराश व्यक्तीला आत्महत्येसारख्या धोक्यापासून वाचवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







