Home /News /heatlh /

'उमलत्या वयातले आघात आयुष्य बदलतात'; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केले धक्कादायक अनुभव

'उमलत्या वयातले आघात आयुष्य बदलतात'; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केले धक्कादायक अनुभव

उमलत्या कळ्यांच्या मनावरचे आघात ओरखडे पुसता पुसले जात नाहीत.

उमलत्या कळ्यांच्या मनावरचे आघात ओरखडे पुसता पुसले जात नाहीत.

तिच्या आजोबांनी ती 11 वर्षाची असल्यापासून 3 वर्ष तिचं आणि बहिणीचं लैगिक शोषण केल्याचं अभिनेत्रीने आपल्या पुस्तकांत लिहीलं आहे.

    दिल्ली, 9 मे : उमलत्या कळ्यांच्या मनावरचे आघात ओरखडे पुसता पुसले जात नाहीत. ज्यांच्या आयुष्यात बालपणी वाईट प्रसंग घडलेले असतात. त्यांना आठवणीही नकोशा वाटत असतात. समाजात अशी अनेक मुलं असतील ज्यांच्या बाबतीत असं काही घडलेलं असतं. जे त्यांना कोणालाही सांगता येत नाही किंवा मनामधुन बाहेर काढताही येत नाही. अशा मुलांना मानसिक समस्यांना (Mental problems) सामोरं जालं लागतं. कधीकधी हा परिणाम इतका गंभीर असतो की, ती मुलं या मधून कधी बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांचं बालपण अत्यंत क्लेशदायक (Traumatic) अनुभवांनी भरलेलं असतं. त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन नकारात्मक (Long-term negative) परिणाम झालेला असतो. पण, त्यातही अशी उदाहरणं मिळतात ज्यांनी बालपणीच्या वाईट प्रसांगावर, अनुभवावर मात करत. स्वत: बळकट बनून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. मुलांपेक्षा मुलींच्या बाबतील असे प्रसंग जास्त घडलेले असतात. (प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू) मात्र, हे वाईट प्रसंग अनुभवलेल्या काही महिला अशाही आहेत ज्यांनी त्यावर मात करून एक यशस्वी आयुष्य सुरु केलं. हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन हे असंच एक नाव आहेत. तिच्या आजोबांनी ती 11 वर्षाची असल्यापासून 3 वर्ष तिचं आणि बहिणीचं लैगिक शोषण केल्याचं शेरॉन स्टोन(Sharon Stone)ने आपल्या पुस्तकांत लिहीलं आहे. तिच्या पुस्काचं नाव आहे 'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस'  (The Beauty of Living Twice) लहान मुलांच्या मनावर ओरखडे बालकांच्या मनावर केवळ लैंगिक शोषणा (Sexual abuse)चा परिणाम होतो असं नाही तर, भूतकाळात घडलेले वाईट प्रसंगही (Bad things that happened in the past) परिणाम करतात. बालपमातील निगेटीव्ह प्रसंग, अनुभव, गैरवर्तन, समोर घडलेले हिसक प्रसंग, एखादी आपत्ती किंवा शाळेत शाळेतील दडपण आणणारे प्रसंग, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू किंवा पालकांचा घटस्फोट यासारख्या इतर घटना देखील बालमनावर परिणाम करतात. यामुळे मुलांचा प्रौढापणी जगाकडे पाहण्यचा दृष्टीकोन बदलतो. (हा काय घोळ? Corona Vaccine न घेताच मिळालं डोस पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट) कोणत्याही गंभीर प्रसंगात लहानपणी झालेला परिणाम कायमस्वरूपी असू शकतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या (Psychiatrist)मते, शरीर ज्या प्रमाणे शारीरिक इजेला प्रतिसाद देत तसच ते  मनासिक त्रासालाही देतं. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, संशोधकांना एस 100 बी नावाच्या प्रथिनांचं उच्च प्रमाण अशा मुलांमध्ये आढळलेल आहे, ही प्रथिने सहसा शारीरिक इजा झाल्यानंतर दिसून येतात, ज्यां मुलांच्या मनावर भावनिक आघात झाला असेल. अशा मुलांमध्ये कधीकधी लक्षणीय तणाव किंवा मानसिक चिंता यांच्यामुळे ही प्रथिनं दिसून येतात. लहानपणी झालेल्या आघांतांमुळे मानसिक ताणाला सामोर जाताना प्रौढपणी अशी मुलं चुकीच्या  सवयींच्या हारी जातत. धुम्रपाण, मद्यपान या सवई लागु शकतात. बालपणीच्या वाईट प्रसंगातून बाहेर येताना लहानपणी मनावर झालेल्या आघातांमधून बाहेर पडणं फारच अवघड आहे,पण संघर्षमय जीवन टाळण्यासाठी हा एकच मार्ग आहे. एम.डी. डेव्हिड सॅक (M.D. David Sack) यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला बरं होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. लहानपणी आघात सहन केलेल्यांना ड्रग्ज (Drugs) किंवा मद्यपानाचं (Alcoholism) व्यसन लागू शकतो. एकता व्यसनाधीन झाल्यास दोन्ही गोष्टींमधून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. या संदर्भातील संशोधनावर एक लेख वुमन वर्कींग मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. (रशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार?) यामुळे बायलॉजिकल (Biological) नुकसान होऊ शकते. 2012 च्या ब्राउन युनिव्हर्सिटी (Brown University)च्या अभ्यासानुसार, गैरप्रसंग किंवा पालकांकडून मिळालेली गैरवर्तणूक असे बालपणी झालेले आघात जीन्सवरही परिणाम करतात. त्यामुले मुलांमध्ये स्ट्रेस, डिप्रेशनसारख्या समस्या बळावता. त्यामुळे त्यांना हेल्दी रिलेशन तयार करण्यात अडचणी येतात.  या प्रसंगांमधून बाहेर येण्यात थेरेपिस्ट (Therapist), सायकॅट्रीस (psychiatrist)ची मदत घेता येऊ शकते. या मुलांना मानसिक आधाराची गरज असते. त्यांना पॉझिटीव्ह वातावरणात (Positive Atmosphere) ठेवल्यास आत्मविश्वास दिल्यास ते बाहेर पडू शकतात. अशी अनेक उदाहरणं जणात आहेत. वेळ लागला तरी बाहेर पडण्याची इच्छा असल्यास योग्य उपचार मिळाल्यास हे शक्य आहे. (मुंबईकरांना मोठा दिलासा! शहरातील कोरोना परिस्थितीचा 'पॉझिटिव्ह' आकडा) या जखमा भरणे शक्य आहे पण या घटनांमधून ही बाहेर प़डलेली उदारणं आहेत. ओप्राह विन्फ्रे (Oprah Winfrey) हे असंच एक उदाहरण आहे. ती एका आता यशस्वी महिलांपैकी एक आहे,पण बालपणी तिला तिच्या कठीण प्रसंगावर  मात करावी लागली. तिच्या मोठ्या चुलत भावाकडून तिला लैंगिक अत्याचार सहन करावे लागले. तेव्हा ती फक्त नऊ वर्षांची होती. तर नातेवाईकांकडूनही तिला मारहाण आणि विनयभंगाच्या प्रसंगांचा सामनाकरावा लागला. पण त्या सर्वांवर मात करुन ती एक सक्षम आणि यशस्वी स्त्री म्हणून समोर आली. असच आणखी एक उदाहरण म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन हे असंच एक नाव आहेत. तिच्या आजोबांनी ती 11 वर्षाची असल्यापासून 3 वर्ष तिचं आणि बहिणीचं लैगिक शोषण केल्याचं शेरॉन स्टोन(Sharon Stone)ने आपल्या पुस्तकांत लिहीलं आहे. तिच्या पुस्काचं नाव आहे 'द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस'  (The Beauty of Living Twice).
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Childhood struggle, Health Tips, Mental health

    पुढील बातम्या