मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covid-19 Crisis: प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू

Covid-19 Crisis: प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू

शासनाकडून वारंवार कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे.

शासनाकडून वारंवार कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे.

शासनाकडून वारंवार कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपुर, 8 मे : राजस्थानमधील (Rajasthan) सीकर (Siakr) जिल्ह्यातील खीरवा गावात गेल्या 21 दिवसात 21 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. याची सुरुवात कोरोनामुळे मृत झालेल्या एक व्यक्तीला कथित स्वरुपात कोरोनाच्या प्रोटोकॉलचं (Covid-19 Protocol) पालन केल्याशिवाय दफन केल्यामुळे झाली. स्थानीय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, गावात 15 एप्रिल ते 5 मे दरम्यान कोरोना व्हायरल संसर्गाच्या कारणामुळे केवळ 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनानुसार गावात गावात एका व्यक्तीची कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यामुळे गुजरातमध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह 21 एप्रिल रोजी खीरवा गावात आणण्यात आला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजारातमधून आलेल्या मृतदेहाच्या अंत्ययात्रेत तब्बल 150 लोक सामील झाले आणि यादरम्यान त्यांनी कोरोना प्रोटोकॉलचं पालन केलं नाही. त्यांनी सांगितलं की, येथे मृतदेह प्लास्टिकमध्ये आला होता. मात्र लोकांनी प्लास्टिकमधून मृतदेह बाहेर काढला आणि अनेकांनी या मृतदेहाला स्पर्श केला होता. लक्ष्मणगडचे उपखंड अधिकारी कलराज मीणा यांनी शनिवारी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितलं की, 21 दिवसात केवळ 3 ते 4 लोकांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्यामुळे झाली आहे. अधिकतर मृत्यू वयस्कर लोकांमधील आहे. याशिवाय आम्ही ज्या कुटुंबात मृत्यू झाले आहेत, त्यांच्या कुटुंबातून 147 लोकांच्या चाचण्या केल्या आहेत. ज्यामुळे कोरोना व्हायरसचा समुदायाक संसर्गाची स्थिती स्पष्ट होईल.

हे ही वाचा-Covid रुग्णाला जगविण्यासाठी थ्री इडियट्सप्रमाणे दुचाकीवर घेऊन गेले अश्विन-रेखा

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रशासनाकडून गावाला संक्रमण मुक्त बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. लोकांना परिस्थितीच्या गांभीर्याबाबत सांगितलं जात आहे, आणि आता लोक सहयोग करीत आहे. तर दुसरीकडे सीकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय चौधरी यांनी सांगितलं की, याबाबत स्थानिक टीमकडून रिपोर्ट मागण्यात आली आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर यावर टिप्पणी केली जाईल. खीरवा गावाचे काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasra) यांनी या मृत्यूबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. मात्र काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलिट केली, त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, एका कोविड पॉझिटिव्ह मृतहेदाला स्पर्श केल्यानंतर संपूर्ण गाव संकटात आलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Covid-19 positive, Rajasthan