कोरोनाविरोधी दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण मिळवण्याचे मुंबईचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. गेले काही दिवस मुंबईतील सर्वाधिक रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. पण आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
2/ 6
मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट लक्षणीयरित्या घसरला आहे. मुंबईत मागच्या काही दिवसात रुग्ण पॉझिटिव्ही दर हा 10 टक्क्यांच्या आसपास होता. पण आता तो यापेक्षाही कमी झाला आहे.
3/ 6
पॉझिटिव्हीटी दर म्हणजे एकूण चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण. सध्या मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा जवळपास पावणेआठ टक्क्यांवर आला आहे.
4/ 6
मागील 24 तासांत 33 हजार 400 चाचण्या झाल्या. त्यापैकी 2633 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. याचा अर्थ मुंबईतील पॉझिटिव्हीटी दर हा 7.8% आहे.
5/ 6
मुंबईत आतापर्यंत मागच्या सव्वा वर्षाच्या काळात 56 लाख 44 हजार 402 इतक्या चाचण्या झाल्या. त्यापैकी 6 लाख 71 हजार 394 इतके रुग्ण कोरोना बाधित आढळलेत.
6/ 6
कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.