Home /News /explainer /

रशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार?

रशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार?

स्पुतनिक लाईट (Sputnik Light) ही कोरोना लस (Corona Vaccine) कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतासाठी वरदान ठरू शकते.

नवी दिल्ली, 08 मे : रशियन (Russia) बनावटीची आणि एकच डोस पुरेसा (Single dose corona vaccine) असेली स्पुतनिक लाईट (Sputnik Light) ही कोरोना लस (Corona Vaccine) कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारतासाठी वरदान ठरू शकते. रशियाच्या या सिंगल डोस लशीची लढत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson And Johnson) या सिंगल डोसबरोबर होत आहे. त्याशिवाय कोविशिल्डसारख्या लशींच्या बुस्टर डोससाठीही या लशीचा वापर केला जाऊ शकतो. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे (RDIF) सीईओ किरील दिमित्रीव यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं की, सध्या कोरोनाचा संसर्ग वेगात पसरतो आहे. या स्थितीत स्पुतनिक लाईट ही लस मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या लशीचं उत्पादन त्यांच्या भागीदारांमार्फत भारत, चीन आणि दक्षिण कोरियात केलं जाईल. स्पुतनिक लाईट लशीची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी असेल. रशियामध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा मुख्य स्त्रोत असलेल्या स्पुतनिक लाईटच्या डबल डोसची आवृत्ती आहे. जगातील इतर देशांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रशिया स्पुतनिक लाइटची निर्यात करेल. दिमित्रीव पुढे म्हणाले की, यंदा जून महिन्यापर्यंत स्पुटनिक लाईट लस जगातील बहुतांश देशांमध्ये रजिस्टर्ड होईल आणि तिचा पुरवठा वेगात सुरू होईल. हे वाचा - DRDO च्या Anti-Covid Drug ला मंजुरी; कमी ऑक्सिजनमध्ये औषधानेच बरा होणार रुग्ण भारतातील आरडीआयएफचा सर्वात मोठा भागीदार असलेली डॉ. रेड्डी ही कंपनी सध्या देशात आरडीआयएफ स्पुतनिक V (Sputnik V) या डबल डोस लशीची आयात करत आहे. कंपनी लवकरच देशातंर्गत या लशीचं उत्पादन सुरू करेल. डॉ. रेड्डीने आरडीआयएफशी केलेल्या सायलेंट पीरिएडचा (Silent Period) उल्लेख करत स्पुतनिक लाईट व्हर्जनविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 वरील एकच डोस लस दोन डोस लशीच्या तुलनेत दुप्पट लोकांना दिली जाऊ शकते. परंतु या लशीची गुणवत्ता अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसंच त्याबाबत अद्याप मजबूत क्लिनिकल डेटा उपलब्ध नाही. सिंगल डोस लशीच्या अनुषंगाने असणाऱ्या चिंतेविषयी बोलताना विषाणू तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितलं, सर्व अडेनो व्हायरस लशी त्यांच्या पहिल्याच डोसमध्ये (किमान अल्पमुदत संरक्षणासाठी) जास्तीत जास्त परिणाम देतात. आतापर्यंत जॉन्सन अँड जॉन्सनने सिंगल डोस लस तयार केली आहे. जर कोणत्याही सिंगल डोस लशीला मजबूत क्लिनिकल कार्यक्षमतेच्या डेटाच्या आधारे मंजुरी दिली गेली असेल तर आम्ही देखील त्यास मान्यता देऊ शकतो. हे वाचा - कोविड रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय जरी स्पुतनिक लाईट किंवा स्पुतनिकच्या सिंगल डोस लशीने कितपत संरक्षण मिळू शकतं, याबाबत अद्याप डेटा उपलब्ध नसला तरी त्यामुळे अल्पावधीत संरक्षण मिळू शकत असेल तर मोठ्या लोकसंख्येला त्वरित लस दिली जाऊ शकते आणि यामुळे कोरोनापासून दिलासा मिळू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्पुतनिक लाइट ही कोणती वेगळी लस नसून स्पुतनिक व्ही लशीचा पहिला डोस आहे. आरडीआयएफचे किरील दिमित्रीव म्हणाले की, स्पुतनिक लाइट ही लस कोरोनाच्या सद्यःस्थितीतील सर्व म्युटेशनविरोधात (Mutation) सुरक्षा देऊ शकेल. नुकत्याच नोंदवलेल्या निरीक्षणानुसार स्पुतनिक लाइट ही लस कोरोनाविरोधात 79.4 टक्के प्रभावी ठरू शकते.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine

पुढील बातम्या