मुंबई 09 जुलै : देशभरात वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनानं (Coronavirus) थैमान घातलं आहे. यामुळे बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) दिलं आहे. मात्र, या काळात कामाचे तास आपोआपच वाढले आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यानं कमी लोकांवर अधिक कामाचा लोड आहे. यामुळे, बरेच लोक तासंतास एकाच जागी बसून काम करत आहेत. याचे माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक परिणाम (Impacts of Working From Home) होत आहेत. याच बाबत डॉ. अमित सराफ (Dr. Amit Saraf) यांनी अधिक माहिती आणि सल्ला दिला आहे. डॉ. अमित सराफ महणाले, की बराच वेळ एकाच जागी बसून हाडांमध्ये स्थुलपणा आणि कमजोरी येते. तसंच रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉटिंग होतं, तासंतास बसून असल्यामुळे बरेच जण पाणी कमी पितात, यामुळे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, मधुमेह असे अनेक आजारही संभावतात. वर्क फ्रॉम होमचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम सांगताना ते म्हणाले, की माणूस सामाजिक प्राणी आहे, मात्र या काळात भेटीगाठी कमी झाल्यामुळे मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बरेच लोक डिप्रेशनमध्ये गेले आहेत. Explainer : AVN म्हणजे नेमका काय आजार आहे? वाचा कोरोनाशी असलेला संबंध शारीरिक समस्या कशा दूर कराव्या - या काळात सोपे आणि बसल्या बसल्या करण्याचे व्यायाम करावे. बऱ्याचशा ठिकाणी याबाबतची माहिती मिळते. टेबल खुर्चीच्या मदतीने पाच मिनिटाचा ब्रेक घेऊन हे व्यायाम करता येतात. तसंच दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी पाठीचे व्यायाम करणं गरजेचं आहे. या काळात आपण पाणीही कमी पितो. मात्र, अडीच ते तीन बाटल्या पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे रक्तप्रवाह सुरळित राहतं. कामाच्या मध्ये शॉर्ट ब्रेक घेणं गरजेचं आहे. तसंच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्या घरातून किंवा खिडकीतून तसंच रुममधून दिसणारा सर्वात दूरचा एखादा पॉईंट निरीक्षण करून बारकाईनं पाहावा, याचा डोळ्यांना फायदा होतो
Cytomegalovirus: काय आहेत याची लक्षणं आणि कोविड-19 शी याचा कसा आहे संबंध? कामाचं स्वरुप किंवा किती वेळ काम करावं - अंदाजे आठ तासाचा वर्कींग डे असावा. मेडिकली विचार केल्यास घरून काम करतानाही प्रत्येक दोन तासाला ब्रेक आणि पाणी जास्त घ्यावं. आठ तासापेक्षा जास्त वेळ काम शक्यतो करू नये. अधिक वेळ बसून राहून ब्लड क्लॉटिंग होतं. तसंच वजन वाढतं, यामुळे हृदयावर ताण येतो, हाडे सांधे यावर लोड येतो. ब्लड प्रेशरसंबंधी समस्या जाणवतात. आठवड्यात ५५ तासापेक्षा जास्त वेळ काम केलेल्या लोकांमध्ये या समस्या आढळतात, असंही डॉक्टर सराफ म्हणाले.