Explainer : Avascular Necrosis म्हणजे नेमका काय आजार आहे? वाचा कोरोनाशी असलेला संबंध

Explainer : Avascular Necrosis म्हणजे नेमका काय आजार आहे? वाचा कोरोनाशी असलेला संबंध

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसला ऑस्टिओ नेक्रोसिस (Ostio Necrosis) असंही म्हणतात. यामध्ये हिप्सच्या (Hips) जॉईंटना (Joints) रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत होतात.

  • Share this:

नवी दिल्ली 09 जुलै: कोविड-19 मधून (Covid-19) बरे झालेल्या रूग्णांना काळी बुरशी (Black Fungus), पांढरी बुरशी किंवा म्युकरमायकोसिस (Mucor Mycosis) असे आजार होत असतानाच आता यात आणखी एका आजाराचाही यात समावेश झाला आहे. ​अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन) (Avascular Necrosis-AVN) म्हणजेच हाडांमधील ऊती (Bone Tissue) नष्ट होण्याचा हा आजार आहे. कोविड-19 वरील उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टिरॉइड्सचा (Steroids) याच्याशी संबंध असल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे.

मुंबईत (Mumbai) आतापर्यंत या आजाराचे तीन रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोविड-19 होऊन गेल्यानंतर दोन महिन्यांनी हा आजार झाल्याचं आढळलं आहे.

AVN म्हणजे नेमका काय आजार आहे?

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसला ऑस्टिओ नेक्रोसिस (Ostio Necrosis) असंही म्हणतात. यामध्ये हिप्सच्या (Hips) जॉईंटना (Joints) रक्तपुरवठा पोहोचत नसल्यानं हाडांच्या ऊती मृत होतात. यामुळे हाडाचे लहान तुकडे होतात आणि शेवटी ती तुटतात किंवा हाडांचा आकार बदलू लागतो आणि हळूहळू तीव्र संधिवात (Arthritis) होतो. 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हा आजार आढळतो.

लहान मुलांचं सप्टेंबरपासून लसीकरण होणार? Zydus Cadila लशीबाबत प्रमुखांची माहिती

लक्षणं :

सुरुवातीच्या काळात अनेकांना याची कोणतीही लक्षणे (Symptoms) दिसत नाहीत, परंतु सांध्यातील वेदना आणि कडकपणा जाणवू शकतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. मांडीचा सांधा, मांडी किंवा हिप्समध्ये वेदना होत असेल तर ते हिपच्या अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे लक्षण असू शकतं. याशिवाय खांदे, गुडघे, हातापायाची हाडे यामध्येदेखील हा आजार फैलावू शकतो. यामुळे पायऱ्या चढताना किंवा चालताना त्रास होतो. काही लोकांना शरीराच्या दोन्ही बाजूला हा आजार होतो.

कारणं :

या आजाराच्या सुमारे 25 टक्के रुग्णांमध्ये, रक्त प्रवाहात कशामुळे अडथळा येतो हे कोडे उलगडत नाही. मात्र सर्वसामान्यपणे पुढील कारणांमुळे हा आजार होतो.

स्टिरॉइड वापर : प्रीडनिसोनसारख्या कॉर्टिकोस्टेरॉईडचा अधिक वापर हे यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे.

हाड किंवा सांध्याचा अपघात : कोणत्याही दुखापतीमुळे सांध्यांना मार बसला असेल तर त्याच्या आसपासच्या रक्तवाहिन्यांनाही मार बसतो. कर्करोगावरील रेडिएशनसारख्या उपचारांनीही हाडं कमजोर होतात त्यामुळं रक्तवाहिन्यांनाही हानी पोहोचू शकते.

कोरोनानंतर Bone death चा धोका; नेमका काय आहे हा आजार?

रक्तवाहिन्यांमधील चरबीचा थर : लिपिड्स अर्थात चरबीचा थर लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतो. त्यामुळे हाडांचा रक्तप्रवाह कमी होतो.

अन्य आजार : सिकल सेल, न्युमोनिया, स्वादुपिंडाचा दाह, मधुमेह, एचआयव्ही / एड्स, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमेटोसस आणि गौचर डिसीज अशा आजारांमुळे हाडांमधील रक्त प्रवाहात अडथळे येतात.

अती मद्यपान : वर्षानुवर्षे दररोज अती प्रमाणात मद्यपान केल्यानं रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.

बिस्फॉस्फोनेटचा वापर : हाडांची घनता वाढविण्यासाठी बिस्फॉस्फोनेटचा दीर्घकाळ वापर केल्यानं, जबड्याचा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय :

उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असतो. त्यामुळं हा आजार होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे.

अल्कोहोल सेवनावर मर्यादा ठेवा : जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं हाडांचा रक्तपुरवठा खंडित होतो, त्यामुळं अती प्रमाणात मद्यपान (Alcohol Consumption) करणं टाळावे.

कोलेस्टेरॉलची पातळी कमी ठेवा : रक्तवाहिन्यांमध्ये चरबिचा थर निर्माण झाल्यानं हाडांच्या रक्तपुरवठ्यात अडथळे येतात. त्यामुळं कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कमी राखणं आवश्यक आहे.

पुन्हा लसींचा खडखडाट; मुंबईत लसीकरणाला ब्रेक, पालिकेनं दिली माहिती

धूम्रपान करू नका : धूम्रपानामुळेदेखील (Smoking)धोका वाढतो.

निदान आणि उपचार :

या रोगाचे प्राथमिक निदान सांध्याच्या तपासणीद्वारे केले जाते. त्यानंतर एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आणि हाडांचे स्कॅनिंग अशा चाचण्या केल्या जातात, ज्यामुळे नेमक्या वेदना कुठे होतात ते कळते.

उपचार :

उपचारांमध्ये पहिलं प्राधान्य हाडं वाचवण्याला असतं. त्यामुळे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसच्या सुरुवातीच्या अवस्थेत, औषधोपचार आणि इलेक्ट्रिक स्टीम्युलेशन थेरपी दिली जाते. त्यामुळे झीज झालेल्या हाडाच्या ठिकाणी नवीन हाड निर्माण होण्यास उत्तेजना दिली जाते. मात्र हा आजार गंभीर पातळीवर पोहोचलेला असेल तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. अशावेळी डॉक्टरही शस्त्रक्रियेची शिफारस करतात.

Published by: Kiran Pharate
First published: July 9, 2021, 2:18 PM IST

ताज्या बातम्या