जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ; या 5 टिप्समुळे जीवनात घडेल मोठा बदल

मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ; या 5 टिप्समुळे जीवनात घडेल मोठा बदल

मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ; या 5 टिप्समुळे जीवनात घडेल मोठा बदल

जर तुम्ही जाड झाला असाल आणि तुमचे वजन खूप वाढले असेल तर तुमच्या शरीराची ही स्थिती तुम्हाला लाजवेल की, तुम्ही आहे ती स्थिती स्वीकारून आयुष्यात पुढे जाल? जर तुमच्यात त्यासाठी स्व-स्वीकार असेल तर तुम्ही आनंदी राहायला शिकाल.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : स्व-स्वीकृती (सेल्फ एक्सेप्टेंस) ही अशी गोष्ट आहे जी लगेच मिळवता येत नाही. निघून जात असलेल्या वेळेतूनच ती मिळू शकते. स्व-स्वीकृती आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करते. त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, व्यावसायिक जीवनावर, शिक्षणावर, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक पैलूंवरही परिणाम होतो. हिंदुस्तान टाईम्स च्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही जाड झाला असाल आणि तुमचे वजन खूप वाढले असेल तर तुमच्या शरीराची ही स्थिती तुम्हाला लाजवेल की, तुम्ही आहे ती स्थिती स्वीकारून आयुष्यात पुढे जाल? जर तुमच्यात त्यासाठी स्व-स्वीकार असेल तर तुम्ही आनंदी राहायला शिकाल. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. केतम हमदान यांनी त्यांच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टमध्ये अशा काही पाच टिप्स दिल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्व-स्वीकृतीला सुलभ बनवू शकता. स्वत:ला माफ करायला शिका: स्व-स्वीकृती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे स्वतःला क्षमा करणे. स्वतःबद्दल दयाळूपणा आणि दया दाखवा. तुम्ही तुमच्या मित्राशी जसे बोलता तसे स्वतःशी बोला. स्व-स्वीकृतीसाठी भूतकाळाला कधीही सोबत घेऊन जाऊ नका, त्याऐवजी भूतकाळाकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून बघा, ज्याला आपण ओळखत नाही किंवा त्याची काळजी करण्याची गरज नाही. पूर्वी मी असा होतो, तसा होतो, पूर्वीच्या त्या गोष्टी चांगल्या होत्या, असे म्हणत बसू नका, भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात आपण काय बदलू शकतो, यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांसाठी स्वतःला माफ करायला शिकाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल. मन शांत करा: स्व-स्वीकृतीसाठी तुम्हाला दुसरी गोष्ट ही लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणे थांबवणे. आपल्यापैकी बर्‍याच जणांना आपल्यातील नकारात्मक सेल्फ टॉकची जाणीवही नसते. म्हणजे बरेच लोक त्यांच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार-चर्चा करू लागतात. आत्म-स्वीकृतीसाठी आपण आपले मन शांत करणे आणि आपले आंतरिक विचार ऐकणे आवश्यक आहे. तुम्हाला कशामुळे त्रास होत आहे आणि कशामुळे तुम्हाला लाज वाटते याचा नेमका विचार करा.

जाहिरात

आपल्या आतील समीक्षकाकडे लक्ष द्या: आपण स्वत: ला स्व-स्वीकृती करण्यास मदत करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आतील समीक्षकावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमचा आतला आवाज तुम्हाला सांगतो की, तुम्ही पुरेसे चांगले नाही आणि नवीन अपेक्षा निर्माण होत आहेत. तुमचा समीक्षकच तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे याची सूचना देतो. तुमच्या सामर्थ्यांकडे लक्ष द्या: स्वत:ची स्वीकृती मिळविण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमची ताकद ओळखावी लागेल आणि तुमच्या 3 बलस्थानांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणत्याही व्यक्तीची ऊर्जा जिथे ध्यान असते तिथे जाते. जेव्हा तुम्ही तुमची ताकद ओळखता तेव्हा तुम्ही योग्य काय आहे यावर लक्ष केंद्रित कराल. हे वाचा -  स्कीन केअरमध्ये या 6 गोष्टींचा अतिवापर ठरेल मारक; त्वचेनुसार अशी घ्या काळजी तुलना करणे थांबवा: स्व-स्वीकार करणे आव्हानात्मक आहे म्हणूनच लोक सहसा इतरांशी स्वतःची तुलना करत राहतात. जेव्हा तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवता, तेव्हा तुम्ही खरोखरच स्वतःच्या आत डोकावू लागता. बाह्य प्रमाणीकरण स्व- स्वीकृतीसाठी थोडेसे महत्त्वाचे आहे आणि तुम्हाला स्वतःची तुलना करणे थांबवावे लागेल. हे वाचा -  आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात