मुंबई, 10 सप्टेंबर : स्कीन केअरसाठी घरगुती उपायांचा अवलंब केल्यास त्वचेचे कमीत कमी नुकसान होते. केमिकलयुक्त गोष्टींपेक्षा चेहऱ्यावर त्याचे साईड इफेक्ट कमी दिसतात, त्याचा फायदा दीर्घकालीन असतो. अलिकडे स्कीनसाठी घरगुती उपायही भरपूर केले जात आहेत. परंतु, या चक्रात बरेच लोक आपल्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येमध्ये अशा गोष्टी देखील वापरण्यास सुरवात करतात ज्यामुळे आपल्या त्वचेला कमी-जास्त प्रमाणात हानी पोहोचते. स्किन केअरमध्ये कोणत्या गोष्टी वापरू नयेत, याविषयी जाणून (Never Use These Things In Skin Care) घेऊया.
स्कीन केअरमध्ये या गोष्टींचा वापर टाळा -
लिंबू -
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, त्यामुळे त्वची चमकदार बनवते आणि बारीक रेषा कमी होतात. पण, त्यात अॅसिडिक घटक देखील आढळतात, ज्यामुळे चेहऱ्यावर ऍलर्जी किंवा खाज येऊ शकते.
साखर -
साखरेचा वापर अनेक लोक त्वचेला स्क्रब करण्यासाठी करतात. साखर एक उत्कृष्ट एक्सफोलिएटर म्हणून काम करते. परंतु, जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर त्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर जास्त वापरामुळे त्वचा कोरडी देखील होऊ शकते.
मीठ -
मिठामुळे त्वचेवरील इंफलामेशन कमी करता येते आणि ब्लॉक झालेली छिद्रे उघडता येतात. मात्र, त्याचे छोटे कण त्वचेलाही नुकसान पोहोचवू शकतात. इतकेच नाही तर त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होण्याचा त्रास देखील होऊ शकतो.
टूथपेस्ट -
चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी अनेक लोक टूथपेस्टचा वापर करतात. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये अनेक रसायने असतात ज्यामुळे त्वचेवर खाज आणि जळजळ वाढू शकते. एवढेच नाही तर त्वचेच्या संरक्षणात्मक थरालाही हानी पोहोचू शकते.
बेकिंग सोडा -
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी बेकिंग सोडा अजिबात वापरू नये. तुम्ही चुकून बेकिंग सोडा थेट चेहऱ्यावर वापरला तर त्याचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. चेहऱ्यावरील पुरळ, चट्टे कमी होण्याऐवजी वाढू शकतात.
हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
व्हिनेगर -
व्हिनेगर चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. अनेक लोक चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी किंवा मुरुम आणि पिंपल्स कमी करण्यासाठी व्हिनेगर वापरतात. पण त्यामुळे त्वचेवर ठिपके येऊ शकतात.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.