मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

World Suicide Prevention Day 2022: आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत

World Suicide Prevention Day 2022: आत्महत्या करण्यापूर्वी लोकांचे असे असते वर्तन; वेळीच ओळखून करा मदत

आज 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' साजरा केला जात आहे. दरवर्षी 10 सप्टेंबर हा दिवस आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काही लक्षणे ओळखून तुम्ही त्यांचे जीवन वाचवू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : आत्महत्येच्या विचाराला मानसिक आजार म्हणता येणार नसून मानसिक विकार (मेंटल डिसऑर्डर) म्हणता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यावर प्रतिबंध करणे शक्य आहे आणि योग्य वेळी समुपदेशन केल्यास एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती सुधारण्यास खूप मदत होते. कुटुंब आणि मित्रांनी तशा व्यक्तीच्या वागण्यावर किंवा हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्याची मानसिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. अनेक वेळा असे लोक स्वतःला खोलीत कोंडून घेतात आणि हळूहळू सामाजिक गोष्टी-उपक्रमांपासून दूर राहतात. वेबएमडीच्या अहवालानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीची काही सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात. ती ओळखून आपण एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातून वाचवू (World Suicide Prevention Day) शकतो.

आत्महत्येची लक्षणे ओळखा -

दीर्घकाळ तणावात : दीर्घकाळ टिकणारे दुःख, मूड बदलणे, मनःस्थिती बदलणे आणि अचानक राग येणे ही आत्महत्येच्या पूर्वीची लक्षणे असू शकतात.

खूप निराशा : भविष्याबद्दल अत्याधिक हताश वाटणे हे अनेकदा आत्महत्येचे लक्षण मानले जाते.

झोपेच्या समस्या : जर एखाद्या व्यक्तीला दिवस-रात्र झोप येत नसेल आणि सतत अस्वस्थ वाटत असेल, तर असे होऊ शकते की तो खूप मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि स्वतःचा जीव घेण्याचा विचार करत असावा.

अचानक शांत होणे : जर एखादी व्यक्ती अचानक नैराश्य किंवा मुडी वर्तनानंतर शांत झाली तर ते त्याचे जीवन संपवण्याचा विचार करत असल्याचे लक्षण असू शकते.

एकटेपणा : जर एखादी व्यक्ती एकटी राहू लागली किंवा मित्र आणि सामाजिक उपक्रमांपासून दूर जात असेल तर ते नैराश्याचे लक्षण आहे. जे आत्महत्येचे प्रमुख कारण ठरू शकते. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या जवळच्या मित्रांनाही भेटण्याचीही इच्छा होत नाही.

व्यक्तिमत्व किंवा हावभावातील फरक: अशा लोकांची चालणे-वागणे-बोलण्याची पद्धत बदलू लागते. उदाहरणार्थ, हळू बोलणे किंवा मंद चालणे, कमी बोलणे, शांत राहणे इ.

स्वत:ला इजा होईल असे कृत्य - जर एखादी व्यक्ती धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असेल किंवा ड्रग्सचे सेवन करत असेल किंवा असे काही करत असेल ज्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो, तर ते आत्महत्येमधील धोकादायक लक्षण असू शकते.

ट्रामा किंवा लाइफ क्राइसेस सिचुएशन - जर त्याचा अलीकडे अपघात झाला असेल ज्यामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीचा किंवा पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला असेल किंवा तो एखाद्या मोठ्या आजारावर उपचार घेत असेल किंवा नोकरी गमावली असेल किंवा गंभीर आर्थिक समस्येतून जात असेल.

त्याचे काम अचानक पूर्ण होणे: अनेकदा, आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती आपली वैयक्तिक कामे पूर्ण करू लागल्यास तो आत्महत्येचा विचार करत असण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटणे, वैयक्तिक मालमत्ता दान करणे, इच्छापत्र करणे, खोली किंवा घर साफ करणे इ.

हे वाचा - युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनपासून मुक्त होण्यासाठी करा हे 4 घरगुती उपाय

आत्महत्येची धमकी देणे : आत्महत्येचा विचार करणाऱ्यांपैकी 50 ते 75 टक्के लोक मित्र किंवा नातेवाईकांना धमकी किंवा आत्महत्येविषयी बोलून दाखवतात.

वरील या काही गोष्टी लोक आत्महत्यापूर्वी करत असल्याचे दिसून आलेले आहे. आपल्या संपर्कातील कोणी व्यक्ती असे कृत्य करत असेल तर त्याची काळजी घेण्याची गरज आहे.

हे वाचा - वारंवार तहान लागणं हे गंभीर संकेत, या आजारात दिसतात Excessive Thirst ची लक्षणं

उपाय काय?

डॉक्टर आणि थेरपिस्टशी संपर्क साधा.

त्याच्या उदासीनतेचे कारण विचारा.

औषधोपचार करा.

त्याच्या आजूबाजूला रहा आणि एकटे सोडू नका.

त्याला प्रेरित करा आणि त्याला योग्य मार्ग दाखवा.

त्याच्याशी बोलत राहा आणि लक्ष द्या.

First published:

Tags: Mental health, Person suicide