मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Corona काळात गुळण्या करण्याचे फायदे आहेत आणि तोटेसुद्धा; बघा डॉक्टरांचा सल्ला

Corona काळात गुळण्या करण्याचे फायदे आहेत आणि तोटेसुद्धा; बघा डॉक्टरांचा सल्ला

सतत गुळण्या केल्याने काय होतं हे माहिती व्हायला हवं.

सतत गुळण्या केल्याने काय होतं हे माहिती व्हायला हवं.

डॉक्टरांच्या मते,कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने काय फायदा होतो याबद्दल कोणतही साइंटिफीक रिसर्च (Scientific research) झालेला नाही.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Corona) देशात भितीचं वातावरण आहे. रोज कोरोना संक्रमणाच्या केसेस (Cases of Corona Infection) वाढत आहेत. काही दिवसांपासून कोरोना पेशंटची संख्या कमी होत आहे. मात्र कोरोना संक्रमणाने मृत्यू (Death by corona infection) होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची भिती पसरलेली आहे. त्यामुळे काय करावं? काय करू नये? याची माहिती प्रत्येक जण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावा, हात सॅनिटाईज करा अशा सूचनांचं पालन सगळेच करतात असं नाही. कामामुळे घराबाहेर पडावं लागलं तर, स्वत:ची काळजी कशी घ्यावी ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.

(कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?)

त्यातच गरम पाण्याने आंघोळ करा, वाफ घ्या, गरमगरम काढा घ्या आणि कोमट पाण्याच्या गुळण्या (Gargal with Warm Water) करणे याने कोरोना होत नाही. अशी धारणा सगळ्याच्या मनात निर्माण झाली होती. मात्र आता तज्ज्ञांनी यासंदर्भात आपलं मत (Expert Opinion) व्यक्त केलं आहे. त्यामुळे सतत गुळण्या केल्याने काय होतं हे माहिती व्हायला हवं. डॉक्टरांच्या मते,कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने काय फायदा होतो याबद्दल कोणतही साइंटिफीक रिसर्च (Scientific research) झालेला नाही. त्यामुळे हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशातील इन्फेक्शन आणि सूज कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सर्दी किंवा खोकला झाला असेल तर, गुळण्यांनी फायदा मिळतो. यासंदर्भातली माहिती ओन्लीहेल्थने दिलेली आहे.

(कसं शक्य आहे? प्रत्यक्ष Intercourse न करता फक्त मुखमैथुनामुळे 'ती' प्रेग्नंट)

गुळण्या जास्त वेळा करू नका

पण, कोरोनाच्या भीतीने काही लोक दररोज सतत गुळण्या करतात. त्याचे साइडइफेक्ट (Side Effects)होऊ शकातात.

ब्लड प्रेशर

डॉक्टरांच्या मते मीठ पाण्याच्या जास्त गुळण्या केल्याने ब्लड प्रेशर (Blood Pressure)वर परिणाम होतो. खरतरं, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे अशा लोकांना मीठ कमी खाण्या सांगितलं जात. मात्र हे लोक मीठ पाण्याच्या गुळण्या करत असतील, तर, थोड्याफार प्रामाणात मीठ शरीरात जातंच त्यमुळे त्यांच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो.

घशाचा अल्सर

काही लोक कोमट पाण्याऐवजी गरम पाण्याने गुळण्या करतात. याचा घशावार उलटा परिणाम होतो. गरम पाण्याने घशाचा अल्सर (Ulcers) होऊ शकतो. त्यामुळे जास्त गरम पाण्याने गुळण्या करु नयेत. गरम पाण्याने घशात रॅशेस (Rashes) होतात किंवा तोंडही येऊ शकतं.

(पुरुषांनाही असतो या कामात Interest; समाजाने स्वीकारला बदल)

घशाला सूज

घशामधील इन्फेक्शन बरं होण्यासाठी गुळण्या करणाऱ्यांनी उगीचच सतत गुळण्या करु नयेत. त्याने घसाला सुज येऊ शकते. त्यामुळे इनफेक्शन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.

त्यामुळे गुळण्या कराव्यात का? करायच्या तर कशा पद्धतीने ? याची माहिती घेऊयात.

गुळण्या कधी कराव्यात

जेवणानंतर गुळण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेवण केल्यावर किंवा काही खाल्यावर गुळण्या करण्याने फायदा होतो. यासाठी गार पाणी वापरलं तरी चालतं. गुळण्या केल्याने दातामध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे दात स्वच्छ राहतात.

(सप्लिमेंटची गरज नाही; आहारातून जास्तीत जास्त प्रमाणात असं मिळवा Vitamin C, Zinc)

किती वेळा करावं ?

डॉक्टरांच्या मते दिवसातून 3 वेळाच गुळण्या कराव्यात. गुळण्या करताना कोमट पाणी वापरावं. गुळण्या केल्याने कोरोना व्हायरस मरत नाही. या संदर्भात कोणतंही रिसर्च झालेलं नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये. पण, गुळण्या करणं तोंडाच्या स्वच्छतेसाठी चांगलं असतं.

कशा कराव्यात गुळण्या?

गळ्यातील सुज आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी गुळण्या करत असाल तर, त्यासाठी बीटाडीन वापरावं. बीटाडीन हे ऍन्टीबॅक्टेरीयल औषध आहे. त्यामुळे इन्फेक्शन लवकर कमी होतं. इन्फेक्शन नसलेल्या माणसांनी जास्त वेळा गुळण्या करु नयेत. कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालून गुळण्या करव्यात. पण मीठ पाण्याच्या गुळण्यांनी कोरोनाचे विषाणू मरत नाहीत. त्याने केवळ तोंड स्वच्छ होतं. कोमट पाण्याने गुळण्या करताना 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ पाणी ठेऊ नये.

(आता पाण्यातून कोरोना पसरण्याचा धोका? गंगा, यमुनातील मृतदेहांमुळे वाढली भीती)

कोमट पाण्यात हळद

आयुर्वेदानुसार हळद गुणकारी मानली गेली आहे. हळदीमध्ये ऍन्टीसेप्टीक आणि ऍन्टीबॅक्टेरीयल गुण असतात. त्यामुळे काही आजारात घरगुती उपाय म्हणून हळद वापरली जाते. मात्र गुळण्या करताना हळदीचा प्रमाणात वापर करावा.

कोरोनाकाळात इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी सांगण्यात आलेले, चर्चत असलेले उपाय  करताना त्यांचे चांगले वाईट परिणाम  शोधायला हवेत. उगाच कोणतेही प्रयोग शरीरावर करु नयेत. त्याऐवजी  डॉक्टरांचा सल्ला घंणं चांगलं.

First published:

Tags: Advice, Coronavirus, Health Tips