सप्लिमेंटची गरज नाही; आहारातून जास्तीत जास्त प्रमाणात असं मिळवा Vitamin C आणि Zinc

सप्लिमेंटची गरज नाही; आहारातून जास्तीत जास्त प्रमाणात असं मिळवा Vitamin C आणि Zinc

आपलं शरीर हे जीवनसत्व साठवत नसल्याने ते दररोज अन्नातून घेणं महत्त्वाचे आहे.

  • Share this:

दिल्ली, 11 मे : गेल्या दोन दिवसांत देशातल्या नवीन कोरोनाबाधितांच्या (Corona Patients) संख्येत काहीशी घट दिसते आहे. तरीही नवीन बाधितांची रोजची संख्या तीन लाखांच्या वरच आहे. देशातली कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाचे पेशंट रोज  वाढत असल्याने देशात चिंतेच वातावरण आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमीन सी (Vitamin C)आणि झिंक(Zinc) आवश्यक असल्याचं आपल्या सगळ्यांना माहित झालं आहे. पण व्हिटॅमिन सी आणि झिंक कोणत्या पदर्थांमधून मिळतं? त्याचा शरीराला काय फायदा होतो? याची माहितीही असण आवश्यक आहे. हे घटक जास्तीत जास्त आहारातून कसे आपल्या शरीरात जातील याची माहिती आपण घेऊया.

व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि झिंक (Zinc) रोगांना कारणीभूत असणा-या आजारांशी लढण्यास मदत करतं. आपली प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी आवश्यक असणारे हे दोन महत्त्वपूर्ण पोषक घटक आहेत, कोरोनापासून बचावासाठी, कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी (To fight the corona virus)आणि शरीरात ताकद निर्माण करण्यासाठी व्हिटामीन सी आणि झिंक मिळाणारे पदार्थ आहारात असायला हवेत.

(जन्मानंंतर ना रडलं, ना त्याचं हृदय धडधडलं; 11 मिनिटांनी बाळाने घेतला पहिला श्वास)

कोणत्याही गोळ्या घेण्यापेक्षी नैसर्गिक पद्धतीने (In a natural way) ते मिळवणं चांगलं आहे. मात्र जरी आपण आहारात हे दोन घटक असलेल्या पादर्थांचा समावेश केला तरी आपलं शरीर त्यांचं योग्यप्रकारे शोषण (Absorb) करत नाही. त्यामुळे या घटकांचं जास्ती जास्त शरीरात शोषण होईल अशी पद्धत अवलंबली पाहिजे.

व्हिटॅमिन सी आणि झिंकचे फायदे

झिंक (Zinc) हे एक खनिज आहे. शरीरात थोड्याफार प्रमाणात का असेना झिंक असायला हवं. डीएनए तयार करणं, पेशींची वाढ, प्रथिनं तयार करणं, खराब झालेल्या पेशी बऱ्या करणं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं यात झिंक महत्त्वाचं काम करतं. तर लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील वाढ आणि गर्भधारणा यासारख्या वेगवान वाढीच्या काळात झिंकला विशेष महत्त्व आहे. अंड्यामधून झिंक मिळतं.

(घराघरात बनणार एक खास पदार्थ आहे Immunity Booster;ऋजुता दिवेकरच्या टीप्स)

सी व्हिटॅमिन (Vitamin C) व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) आणि जखमा  बऱ्या करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतं. हे एक अँटीऑक्सिडेंट (Antioxidants) आहे. शरीरातील चयापचय प्रतिक्रियेत देखील ते महत्त्वाचं आहे आणि शरीरातील कोलेजेनसाठी ते महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन सी हा महत्त्वाचा घटक शरीरात असायला हवा. मात्र व्हिटॅमिन सी शरीरात इतर घटक द्रव्यांप्रमाणे साठवता येत नाही. त्यामुळे त्याचं दररोज सेवन करावं लागतं.

व्हिटॅमिन सीला  Ascorbic Acid देखील म्हटलं जातं हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे. व्हिटॅमिन सी प्रथम पाण्यात विरघळतं आणि नंतर ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जातं. आपलं शरीर हे जीवनसत्व साठवत नसल्याने ते दररोज अन्नातून घेणं महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन सीची आवश्यकता

व्हिटॅमिन सी महत्त्वाचं असलं तरी त्याचं अतिरिक्त सेवन घातक असतं. एका अभ्यासानूसार दिवसातून 1000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेण्याने शरीराची ते शोषण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते आणि अतिरिक्त व्हिटॅमिन सी मूत्रमाद्वारे शरीरातून बाहेर काढलं जातं. एका दिवसात 2000 पेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेतल्यास त्याचा लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय पचनक्रियेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास अँटीऑक्सिडंटऐवजी प्रो-ऑक्सिडेंट म्हणून काम करतं. तर किडनी स्टोनचाही धोका संभवतो.

(कोरोनातून बचावल्यानंतर हा आजार घेतोय जीव; राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली)

आहारतज्ज्ञांच्या मते 19 वर्षांवरील पुरुषांना दररोज 90 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सीची गरज असते. तर त्याचं वयात महिलांना 75 मिलीग्रॅम व्हिटामिन सी हवं असतं. गर्भधारणा आणि स्तनपानाच्या काळात महिलांना 85 ते 120 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी लागतं. तर ज्यांना स्मोकींगची सवय आहे अशांनी अतिरिक्त प्रमाणात 35 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी घेण्याचा सल्लाही दिला जातो..

व्हिटॅमिन सीचं शरीरातलं प्रमाण

कोणत्याही मेडिसीनप्रमाणे व्हिटॅमीन सी घेण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांमधून व्हिटॅमीन सी घेणं चांगलं आहे. फळांच्या माध्यमातून व्हिटॅमिन सी घेण्याचा प्रयत्न करावा. न शिजलेल्या पदार्थांच्या स्वरुपात घेणं उत्तम. शिजवणं किंवा गरम करण्याने व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांची पोषक मुल्य कमी होतात. त्यामुळे व्हिटामिन सी युक्त फळ म्हणजे लिंबू, संत्र,आवळा यांचं सेवन करावं.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 10:10 PM IST

ताज्या बातम्या